मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रार्थना बेहेरे शॉपिंग मोड ऑन; दिवाळीच्या खरेदीचा VIDEO केला शेअर

प्रार्थना बेहेरे शॉपिंग मोड ऑन; दिवाळीच्या खरेदीचा VIDEO केला शेअर

प्रार्थना बेहेरे

प्रार्थना बेहेरे

प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत कनेक्ट असते. नुकताच प्रार्थनानं दिवाळी शॉपिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 24 ऑक्टोबर : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून नेहा कामत म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. या मालिकेमुळे तिला प्रेक्षकांचं खूप सारं प्रेम मिळत असतं. प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत कनेक्ट असते. नुकताच  प्रार्थनानं दिवाळी शॉपिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या लेटेस्ट व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधलं असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती दिवाळी शॉपिंग करताना दिसत आहे. वेगवेगळ्या साड्या ट्राय करताना ती दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया येत असलेल्या पहायला मिळत आहे. चाहते तिला कोणती साडी चांगली दिसतेय हे कमेंट करुन सांगत आहेत.

हेही वाचा -  प्रेम हे! तेजश्री आणि वैभवची केमिस्ट्री पुन्हा खुलणार; 'या' चित्रपटात एकत्र झळकणार

'मराठी मुलगी साडी मधेच छान दिसते, खूप सुंदर दिसते साडी तुमच्यावर, पिस्ता कलर छान दिसतोय, प्रतिम सुंदर दिसतात साडी मॅडम तुम्ही, खूपच सुंदर', अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत. चाहते नेहमीच तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरुन प्रेम देतात.

प्रार्थनानं तिच्या निखळ सौंदर्यानं आणि जबरदस्त अभिनयानं नेहमीच चाहत्यांना भुरळ घातली आहे. अभिनयाच्या जोरावर तिनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. तिचा चाहतावर्ग बराच मोठा असून तिला पुन्हा एकदा चित्रपटात पाहण्यासाठी चाहते प्रतिक्षेत आहे.

दरम्यान, सगळीकडे दिवाळीचं तेजमय वातावरण पहायला मिळत आहे. अनेकजण शॉपिंगमध्ये गुंतलेले आहेत. नवनव्या कपड्यांवर फोटोशूट करत आहे. अनेक कलाकार दिवाळी पार्टीचं आयोजन करत असलेले पहायला मिळत आहे.

First published:

Tags: Diwali, Marathi actress, Marathi news, Prarthana Behere