मुंबई 12 जुलै: प्राण (Pran) हे बॉलिवूडमधील आजवरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. जंजीर, डॉन, अमर अकबर अँथनी, कालिया, धरम वीर, नसीब यांसारख्या सुरपहिट चित्रपटांद्वारे जवळपास पाच दशकं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (Pran Movie) आज प्राण यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं देशभरातील चाहत्यांनी आज पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या आठवणींना नव्यानं उजाळा दिला आहे. (Pran Death Anniversary) प्राण हे एक अष्टपैलू अभिनेते होते. परंतु त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका विशेष गाजल्या. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल एक काळ असाही होता जेव्हा ते खलनायक म्हणून नायकापेक्षा अधिक मानधन घेत असतं.
भाषा तज्ज्ञ कशी झाली अभिनेत्री? पाहा अवलिनचा Germany to India प्रवास
सर्वाधिक मानधनाची सुरुवात झाली जंजीरपासून...
‘जंजीर’ प्रदर्शनासाठी सज्ज होता पण तेव्हा कोणताच डिस्ट्रीब्युटर चित्रपट विकत घ्यायला तयार नव्हता. अमिताभ बच्चन नवखे असल्यामुळे नवीन अभिनेत्यावर पैसे गुंतवायला कोणीही तयार नव्हते. यावेळी दिग्दर्शकांनी चित्रपटाचा मुख्य अभिनेता प्राण असल्याचे सांगायला सुरुवात केली आणि वितरकांनीही हा चित्रपट लगेच विकत घेतला. त्यांच्या नावाचा दबदबा एवढा होता की तेव्हा निर्माते मुख्य अभिनेत्यापेक्षाही त्यांना जास्त मानधन द्यायचे. सिनेसृष्टीत फक्त राजेश खन्ना हे एकमेव अभिनेते होते ज्यांचे मानधन प्राण यांच्याहून जास्त होते.
अली फजलनं का दिला रिचा चड्ढासोबत लग्न करण्यास नकार? सागितलं धक्कादायक कारण
दरम्यान, प्राण यांचे असंख्य चित्रपट आज अजरामर झाले आहेत. त्यामुळे ते देहरुपाने आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते कायम प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. प्राण यांचं खरं नाव प्राण किशन सिकंद असं असून, यमला जट या 1940 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Death anniversary, Entertainment, Pran