मुंबई 12 जुलै: रणबीर कपूरच्या ये जवानी है दिवानी (Yeh Jawaani Hai Deewani) या चित्रपटातून नावारुपास आलेली अवलिन शर्मा (Evelyn Sharma) बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज अवलिनचा वाढदिवस आहे. 35 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Evelyn Sharma birthday) आज ती एक लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून चर्चेत असते. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कधीकाळी ती एक भाषा तज्ज्ञ म्हणून करिअर करण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडे 8 वेगवेगळ्य भाषांचे ज्ञान आहे.
ओळखलंत का या अभिनेत्रीला? कधीकाळी म्हणायचे तिला बॉलिवूडची स्वप्न सुंदरी
अवलिनचा जन्म 1986 साली जर्मनीमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला होता. तिचे भारतीय वंशाचे वडील फ्रँकफर्ट विद्यापिठात शिक्षक आहेत. तर आई एक मॉडेल होती. सुरुवातीला अवलिनला देखील वडिलांप्रमाणेच एक शिक्षक होण्याची इच्छा होती. तिला साहित्यामध्ये विशेष रस होता. त्यामुळे ती जर्मनसोबतच इंग्रजी, लॅटिन, हिंदी अशा विविध भाषांचा अभ्यास करू लागली.
शनाया कपूरचा Bold अवतार; डान्स व्हिडिओनंतर Hot Photo व्हायरल
हळुहळु तिचं भाषेचं ज्ञान वाढलं मग तिने स्पॅनिश, थाई, टेगलॉग, फिलिपिनो, फ्रेंच आणि डच या भाषा देखील शिकण्यास सुरुवात केली. या क्षेत्रात तिला गती होती. त्यामुळे पुढे जाऊन भाषा तज्ज्ञ व्हायचं अशी तिची इच्छा होती. परंतु कॉलेजमध्ये शिकत असताना तिने एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला अन् तिथून तिच्या करिअरला वेगळं वळण प्राप्त झालं. या स्पर्धेमुळे तिचं लक्ष प्रोफेशनल मॉडलिंगकडे वळलं. अन् पुढे मॉडलिंगमधून ती बॉलिवूडमध्ये आली. आतापर्यंत तिने 'ये जवानी है दीवानी', 'यारिया', 'नौटंकी साला', 'मैं तेरा हीरो', जॅक अँड डिल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.