मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अली फजलनं का दिला रिचा चड्ढासोबत लग्न करण्यास नकार? सागितलं धक्कादायक कारण

अली फजलनं का दिला रिचा चड्ढासोबत लग्न करण्यास नकार? सागितलं धक्कादायक कारण

अली फजलनं लग्न करण्यास नकार दिला आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसला आहे.

अली फजलनं लग्न करण्यास नकार दिला आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसला आहे.

अली फजलनं लग्न करण्यास नकार दिला आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसला आहे.

मुंबई 11 जुलै: अली फजल (Ali Fazal) आणि रिचा चड्ढा (Richa Chadha) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कपलपैकी एक आहे. गेली दोन वर्ष हे दोघं लिव्हलिन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. खरं तर गेल्याच वर्षी दोघं लग्न करणार होते. (Richa Chadha and Ali Fazal Wedding) त्यांनी याबाबत सोशल मीडियाद्वारे अधिकृत घोषणा केली होती. शिवाय लग्नाची खरेदी देखील सुरु केली होती. परंतु आता अली फजलनं लग्न करण्यास नकार दिला आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना सर्वांनाच आश्चर्याच धक्का बसला आहे.

‘सलमान खानची माफी माग, अन्यथा…’; अर्शी खाननं केलं KRKला सावध

अलीने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत लग्न न करण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, “खरं आम्ही 2020 मध्ये लग्न करणार होतो. परंतु कोरोनामुळे आमच्या लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. मात्र आता आम्ही आणखी काही काळ लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला दोघांनाही आमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे. भरपूर पैसे कमवायचे आहेत. कारण कधी काय होईल सांगता येत नाही. कोरोना काळात खूप वाईट अनुभव आपण पाहिले आहेत. शिवाय अलिकडेच मी माझ्या कुटुंबातील दोन सदस्य गमावले त्यामुळे लग्नाचा निर्णय आम्ही आणखी काही काळासाठी पुढे ढकलला आहे.”

वडिलांनीच केली सलमानची पोलखोल; सलीम खानपेक्षा या व्यक्तीला अधिक आदर देतो भाईजान

2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘फुकरे’ या चित्रपटाच्या निमित्ताने दोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासूनच दोघांच्या रिलेशनशिपबाबतच्या चर्चा रंगू लागल्या होता. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणारे त्यांचे फोटो आणि व्हिडीओजमुळे तर या चर्चांना आणखी उधाण आले. परंतु या चर्चा केवळ अफवा नव्हत्या हे आता सिद्ध झाले आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Love story, Richa chadha