मुंबई, 12 जून : साऊथसह हिंदी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावणारा प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा बद्दल आनंदाची बातमी समोर आली आहे. 50 वर्षांच्या प्रभूदेवाला आयुष्यात चौथ्यांदा बाप होण्याचं सुख मिळालं आहे. प्रभूदेवा चोथ्यांदा बाबा झाला आहे. प्रभूदेवाच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालंय. दुसरी पत्नी हिमानी हिने एका मुलीला जन्म दिलाय. पुन्हा एकदा बाप झाल्याचा आनंद सध्या प्रभूदेवा साजरा करत आहेत. प्रभूदेवाने 2020मध्ये हिमानीबरोबर दुसरं लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनी हिमानी हिने पहिल्या मुलाला जन्म दिला. प्रभूदेवाला पहिल्या पत्नीपासून 3 मुलं आहेत. तिघेही मुलगे आहेत. अभिनेता चौथ्यांदा बाप झाला असला तरी पहिल्यांदा एका मुलीचा बाप झाला. पहिल्यांदा त्याच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. त्यामुळे अभिनेता प्रचंड खुश आहे. ईटाइम्सशी बोलताना प्रभुदेवानं बाप झाल्याचा आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, हो मी बाप झालोय हे खरं आहे. मी या वयात पुन्हा एकदा बाप झालो. मी खूप खुश आहे आणि स्वत:ला पूर्णत्व मिळालं असं मला वाटतं आहे. प्रभुदेवा पुढे म्हणाला, माझ्या लाडकी लेकीचा जन्म झाल्यानंतर आता मला तिच्याबरोबर जास्तीत जास्त काळ घालवायचा आहे. मी आधीच माझं काम कमी केलं होतं. मी खुप काम करतोय असं मला वाटत होतं. मी खुप काम केलंय आता मला माझ्या फॅमिलीबरोबर वेळ घालवायचा आहे. हेही वाचा - Nayanthara Vignesh : लग्नाच्या 4 महिन्यांनी आई झाली; पहिल्या anniversaryला नयनतारानं दाखवला जुळ्या बाळांचा चेहरा प्रभुदेवानं त्याचं करिअर मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये केलं. दोन्हीकडे तो प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि अभिनेता म्हणून शानदार काम करत राहिला. भारताचा मायकल जॅक्सन असं प्रभुदेवाला म्हटलं जातं. इतक्या वर्षांमध्ये प्रभुदेवानं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीच फारस वक्तव्य केलं नाही. 2020मध्ये त्यानं दुसऱ्यांदा गुपचूप लग्न केलं आणि या लग्नाची खबर कोणालाही लागू दिली नाही. दुसऱ्या पत्नीला घेऊन तिरूपती येथे देवदर्शनासाठी गेल्यानंतर त्याच्या लग्नाची माहिती समोर आली. आपल्या दुसऱ्या पत्नीचा हात हातात घेऊन प्रभुदेवा स्पॉट झाला होता.
प्रभुदेवाची दुसरी पत्नी हिमानी सिंह ही पेशानं डॉक्टर आहे. याआधी प्रभुदेवाचं लग्न 1995मध्ये रामलतबरोबर पहिलं लग्न झालं होतं. रामलत ही प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना होती. रामलत ही मुस्लिम होती प्रभुदेवाबरोबर लग्नानंतर तिनं हिंदी धर्म स्वीकारला. लग्नाच्या 16 वर्षांनी प्रभुदेवा आणि रामलत यांचा घटस्फोट झाला. रामलत आणि प्रभुदेवा यांना तीन मुलगे आहेत.