नयनतारा आणि विघ्नेश 2015मध्ये नानम राउडी धान या प्रोजेक्टच्या शूटींग दरम्यान भेटले होते. सेटवरच दोघांचं प्रेम जमलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट आणि लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 9 जून 2022ला लग्न केलं.
विघ्नेशनं लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत खास पोस्ट लिहिली, त्याने म्हटलंय, "काल तुझ्याशी लग्न केलं आणि आज मला मित्र लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतायत".
"लग्नाच्या पहिल्या वाढदिवासाच्या शुभेच्छा. लव्ह यू थांगामे. बस फक्त आपल्या आयुष्याची सुरूवात प्रेम आणि आशिर्वादाने होऊ देत".
विघ्नेशनं पुढे लिहिलंय, "खूप मोठा रस्ता पार करायचा आहे. खूप गोष्टी एकत्र करायच्या आहेत. चांगले लोकांच्या सद्भावना आणि देवाच्या आशिर्वादाने आपल्या लग्नाच्या दुसऱ्या वर्षाच्या पदार्पणात आपल्याला सर्वात मोठा आशिर्वाद मिळाला आहे तो म्हणजे आपली मुलं उयिर आणि उलागम".
नयनतारा आणि विघ्नेश यांनी लग्नाच्या चार महिन्यांनी सरोगसीद्वारे आई-वडील होण्याचा निर्णय घेतला आणि दोघे जुळ्या मुलांचे पालक झाले.
नयनताराच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर लवकरच ती इरैवन सिनेमात दिसणार आहे. हा अँक्शन थ्रिलर सिनेमा असणार आहे. त्याचप्रमाणे शाहरूख खानच्या जवान सिनेमातून नयनतारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.