जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / प्रेग्नंट समीरा रेड्डीने नवव्या महिन्यात पाण्यात केलं फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

प्रेग्नंट समीरा रेड्डीने नवव्या महिन्यात पाण्यात केलं फोटोशूट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

यापूर्वी समीरा रेड्डीचं अंडरवॉटर फोटोशूट गाजलं होतं. नऊ महिन्याची गरोदर असताना तिने हे फोटोशूट केलं होतं.

यापूर्वी समीरा रेड्डीचं अंडरवॉटर फोटोशूट गाजलं होतं. नऊ महिन्याची गरोदर असताना तिने हे फोटोशूट केलं होतं.

समीरा रेड्डी सोशल मीडियावर सध्या फार सक्रिय आहे. ती आपल्या प्रेग्नंसी, बॉडी शेमिंगवर मनमोकळेपणाने बोलते. याआधीही समीराचे प्रेग्नंसीमधील अनेक फोटो व्हायरल झाले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 जुलै- अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नसी फेज एन्जॉय करत आहे. नुकतंच तिने अण्डरवॉटर फोटोशूट केलं. फोटोमध्ये समीराने बिकीनीमध्ये अनेक बोल्ड पोज दिल्या. तिने यावेळी बेबी बंप फ्लॉन्ट केलाच शिवाय संपूर्ण फोटोशूटमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. समीराचे हे अंडरवॉटर फोटो लोक फार पसंत करत आहेत. अनेकांनी या फोटोंवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तर काहींच्या मते, ‘आता हेच करायचं राहिलेलं…’ अशाही कमेंट दिल्या. तर काहींनी बाळाला रिस्कमध्ये टाकू नका अशा सुचनाही दिल्या. याआधी कोणत्याही अभिनेत्रीने नवव्या महिन्यात पाण्यात जाऊन फोटोशूट केलं नव्हतं. समीराने २०१४ मध्ये व्यावसायिक अक्षय वर्देशी लग्न केलं. २०१५ मध्ये ती एका मुलाची आई झाली. आता समीरा दुसऱ्यांदा आई व्हायला सज्ज झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

फोटो शेअर करताना समीराने लिहिले की, ‘मी नवव्या महिन्यांची गरोदर आहे आणि हा महिना मला पूर्णपणे एन्जॉय करायचा होता. याच काळात आपण सर्वात जास्त दमतो, थकतो, उत्साहितही असतो आणि थोडेसे घाबरलेलेही असतो. मला हा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. यामुले सकारात्मकताही येईल. कारण आपण प्रत्येकजण आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या स्थितीत आणि साइजमध्ये असतो. आपल्याला प्रत्येक परिस्थितीत स्वतःवर प्रेम करायला पाहिजे.’

समीरा रेड्डी सोशल मीडियावर सध्या फार सक्रिय आहे. ती आपल्या प्रेग्नंसी, बॉडी शेमिंगवर मनमोकळेपणाने बोलते. याआधीही समीराचे प्रेग्नंसीमधील अनेक फोटो व्हायरल झाले होते. दरम्यान तिने बेबी शॉवरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. SPECIAL REPORT: अभिनेत्री भाग्यश्री दासानीच्या पतीला मुंबई पोलिसांकडून अटक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात