
सध्या टीव्हीवरील अनेक रिअलिटी शो चर्चेत असतात. बिग बॉस १३ सोबत डान्स रिअलिटी शोही भलतेच चर्चेत आहेत. नच बलियेचा नववा सिझन लवकर सुरू होणार आहे. यावेळी या शोची धाटणी थोडी वेगळी आहे. नुकतंच या शोमध्ये कोण असणार याची अधिकृत यादी समोर आली आहे.

सलमान खानने या शोची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे यावेळी यात एक्स- कपलही यात सहभागी होणार आहेत. रवीना टंडन, अली अब्बास जफर आणि एक नावाजलेला कोरिओग्राफर जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय मनिष पॉल या शोचं सूत्रसंचालन करणार आहे.

एक्स कपल उर्वशी ढोलकिया आणि अर्जुन सचदेवा यावेळी शोमध्ये स्पर्धक म्हणून येणार आहेत. उर्वशीला दोन मुलं असून फार वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता.

याशिवाय एक्स कपल आदित्य सिंग आणि मधुरिमा तुलीही या शोमध्ये दिसणार आहे. दोघांनी चंद्रकांता मालिकेत एकत्र काम केलं होतं.

काही वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकलेले रोशेल राव आणि कीथ सिकेरा नच बलिये ९ मध्ये स्पर्धक म्हणून उतरणार आहेत. लग्नानंतर पहिल्यांदा रोशेल आणि कीथ टीव्हीवर प्रेक्षकांना दिसणार आहेत.

अभिनेता सौरभ राज सिंगही आपली बायको रिद्धीमासोबत नच बलियेमध्ये स्पर्धक म्हणून येणार आहे. सौरभने महाभारत मालिकेत कृष्णाची आणि चंद्रगुप्त मौर्य मालिकेत धनानंदची भूमिका साकारली होती.

अनेक कारणांमुळे चर्चेत राहणारा डीआयडी या डान्स शोचा विजेता फैजल खान त्याची प्रेयसी मुस्कानसोबत या शोमध्ये भाग घेणार आहे.

कुंडली भाग्य मालिकेतील प्रीता अर्थात अभिनेत्री श्रद्धा आर्यही प्रियकरासोबत या शोमध्ये थिरकताना दिसणार आहेत.

टीव्हीची नावाजलेली अभिनेत्री अनीता हसनंदानी आणि तिचा नवरा रोहिन रेड्डीही या स्पर्धेत प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.

या स्पर्धकांमध्ये सर्वात खास जोडी असेल ती कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्ण पदक मिळवणारी गीता फोगट आणि तिचा पती राष्ट्रीय पैलवान पवन कुमार. ही दोघंही या शोमध्ये आपल्या डान्सचं कौशल्य दाखवणार आहेत.




