मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Neha Kakkar Falguni Pathak: वादानंतर नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठकला एकत्र पाहून भडकले चाहते; म्हणाले,'हे लोक प्रसिद्धीसाठी...

Neha Kakkar Falguni Pathak: वादानंतर नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठकला एकत्र पाहून भडकले चाहते; म्हणाले,'हे लोक प्रसिद्धीसाठी...

Neha Kakkar Falguni Pathak

Neha Kakkar Falguni Pathak

'मैंने पायल है छनकाई... ओ सजना' हे फाल्गुनी यांचं गाणं नेहा कक्करने रिमेक केलं आणि त्यानंतर नेहा ट्रोल होऊ लागली. या दोघींमध्ये चांगलाच वाद रंगात आला होता. आता एवढं झाल्यावर नुकतीच फाल्गुनी आणि नेहा नुकत्याच एकाच मंचावर दिसून आल्या.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई,  26 सप्टेंबर:  नवरात्री आलं कि एका गायकाची गाणी गल्लोगल्ली वाजत असतात. त्याच्या ठेक्यावर रसिक मनसोक्त गरबा खेळत असतात. ती गायिका म्हणजे फाल्गुनी पाठक. सध्या त्यांची सगळीकडे चर्चा आहे. पण या चर्चेचं कारण जरा वेगळं आहे. ते म्हणजे नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक  यांच्यातील वाद. हे प्रकरण सध्या फारच गाजतंय.  'मैंने पायल है छनकाई... ओ सजना' हे फाल्गुनी यांचं  गाणं नेहा कक्करने रिमेक केलं आणि त्यानंतर नेहा ट्रोल  होऊ लागली. या दोघींमध्ये चांगलाच वाद रंगात आला होता. एवढाच काय तर दोघींचे चाहते सुद्धा या वादात पडले होते. आता एवढं झाल्यावर नुकतीच फाल्गुनी आणि  नेहा नुकत्याच एकाच मंचावर दिसून आल्या. तो व्हिडीओ   सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

फाल्गुनी आणि नेहा कक्कर एकत्र आल्या त्या इंडियन आयडॉलच्या मंचावर. सोनी टीव्हीवर नुकताच हा कार्यक्रम सुरु झाला आहे.  शनिवार-रविवारी रात्री ८ वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे. सध्या त्याच्या थिएटर राउंडचा एक व्हिडिओ वाहिनीच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला. यामध्ये शोच्या स्पर्धकांसोबत नेहा कक्कर, हिमेश रेशमिया, आदित्य नारायण आहेत पण त्यांच्यासोबत फाल्गुनी पाठक देखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये नेहा कक्कर म्हणते- 'आजचा दिवस खूप चांगला आहे. थिएटर राउंड. माता राणीचं नाव घेऊन याची सुरुवात केली तर यापेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही आणि आपल्यासोबत आज फाल्गुनी मॅडमही आहेत.'

दुसरीकडे, फाल्गुनी नेहाचा चेहरा पाहते आणि जबरदस्तीने हसताना दिसते आणि टाळ्याही वाजवते. यानंतर सर्वजण दांडिया नाचू लागतात. त्याचवेळी फाल्गुनी 'गरबा' गाणे गुणगुणते ज्यावर सर्वजण नाचतात. पण हे पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. त्यांनी या पोस्टवर भन्नाट कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा - Hemangi kavi : 'दगड मातीच्या मूर्तींपेक्षा मी...'; ऐन नवरात्रीत हेमांगीच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

काही चाहत्यांनी म्हणून त्यांच्या शब्दयुद्धाला 'प्रसिद्धी स्टंट' म्हटले. एका युजरने लिहिले, ''हे सर्व लोक गाणे हिट करण्यासाठी काय करतात, लक्ष वेधून घेण्यासाठी आधी ते सोशल मीडियावर भांडतात आणि मग ते टीव्हीवर एकत्र परफॉर्म करतात. काय शो ऑफ आहे.' तर दुसऱ्या युजरने लिहिलंय कि, 'हे लोक प्रसिद्धीसाठी काहीही करू शकतात.' यावरून या दोघींमध्ये सगळं काही अलबेल  असलं  तरी चाहते मात्र नाराज झालेत असं दिसतंय.

नेहा कक्करने 19 सप्टेंबर रोजी 'ओ सजना' गाणे रिलीज केले होते. यानंतर नेहा कक्कर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली होती. यातच फाल्गुनी पाठक  यांनी इंस्टाग्रामवर चाहत्यांच्या स्टोरीला पाठींबा दर्शवला. नेहाचं नाव न घेता त्यांनी तिला लक्ष्य केले. यानंतर नेहाही गप्प बसली नाही.

First published:

Tags: Entertainment, Singer, Singer neha kakkar