जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'या' सुपरस्टारकडे आहे कोट्यवधींचा व्हिला आमिर-सलमानकडेही नाही एवढी संपत्ती

'या' सुपरस्टारकडे आहे कोट्यवधींचा व्हिला आमिर-सलमानकडेही नाही एवढी संपत्ती

'या' सुपरस्टारकडे आहे कोट्यवधींचा व्हिला आमिर-सलमानकडेही नाही एवढी संपत्ती

असं म्हटलं जातं की त्याच्या एवढं महागडं घर संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत कोणाकडेच नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

    हैदराबाद, 10 मे- दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण हा सर्वात टॉलिवूडमधील श्रीमंत अभिनेत्यापैकी एक आहे. 2007 मध्ये ‘चिरुथा’ या सिनेमातून त्याने आपल्या सिनेकरिअरला सुरुवात केली होती. अगदी काही वर्षातच रामचरणचा स्वतःचा असा चाहता वर्ग तयार झाला आहे जो त्याच्यासाठी वाट्टेल ते करू शकतो. सिनेमांशिवाय तो ब्रँड एण्डोर्समेन्ट आणि पर्सनल इनव्हेसमेन्टमधून पैसे कमावणारा राम चरणचा हैदराबादमध्ये जुबली हिल्स या मोक्याच्या ठिकाणावर आलिशान व्हिला आहे. या व्हिलाची किमान किंमत ३८ कोटी रुपये आहे. ‘या’ अभिनेत्याने पाच राज्यांत नऊ ट्रक भरून वाटले आयस्क्रीम, कारण… रिपोर्ट्सनुसार, रामचरणचं हे घर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कोणत्याही सेलिब्रिटींपेक्षा महागडं आहे. रामचरणचं स्वतःचं कोनिडेला नावाचं प्रोडक्शन हाउसही आहे. राम चरणने दोन तमिळ सिनेमांची निर्मितीही केली आहे. तसेच ‘तुफान’ या तमिळ सिनेमासाठी गाणंही गायलं आहे. त्याची निर्मिती असलेल्या आगामी सिनेमात चक्क चिरंजीवी मुख्य भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा तेलगू, तमिळ आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. रामचरणचं नेटवर्थ 1250 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याचं वार्षिक उत्पन्न 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रामचरण हैदराबाद येथील ट्रू जेट या एअरलाइन्सचा मालक आहे. हे कमी की काय त्याची रामचरण हैदराबादर पोलो रायझिंक क्लब नावावरून पोलोच्या टीमचा मालक आहे. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रेंज रोवरशिवाय अनेक महागड्या गाड्या आहेत. ‘तारक मेहता का..’ मधील अभिनेत्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू रामचरणने 14 जून 2012 मध्ये अपोलो हॉस्पिटलचे एग्झिक्युटीव्ह चेअरमन प्रताप सी. रेड्डी यांची नात उपासना कमिनेनीशी लग्न केलं. दाक्षिणाच्य अभिनेता अशी जरी रामचरणची ओळख असली तरी त्याने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. लवकरच रामचरण बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR सिनेमांत काम करणार आहे. या सिनेमात ज्युनिअर एनटीआरही असणार आहे. तसेच सलमान खानच्या भारत सिनेमातही रामचरणची भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. सर्वांसमोर शाहरुखने प्रियांकाला विचारलं, ‘माझ्याशी लग्न करशील का?’, तिनं दिलं हे भन्नाट उत्तर दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात