माधुरी नाही तर मेहुणीमुळे तुटलं संजय दत्तचं पहिलं लग्न

माधुरी नाही तर मेहुणीमुळे तुटलं संजय दत्तचं पहिलं लग्न

रिचाच्या आजारपणामुळे आमचं नातं तुटलं नाही. हे चुकीचे आरोप आहेत. माझ्या बायकोचे केस गळतात म्हणून मी तिच्यावर प्रेम करणं बंद करीन, मी असा माणूस नक्कीच नाहीये.

  • Share this:

मुंबई, 10 मे- संजय दत्तचं व्यावसायिक आयुष्य जेवढं बोललं गेलं त्याहून जास्त चर्चा त्याच्या खासगी आयुष्याबद्दल झाली. संजयची एकूण तीन लग्न झाली. मान्यताशी लग्न करण्यापूर्वी संजयने रिया पिल्लई (१९९८) आणि रिचा शर्मा (१९८७) या दोघींशी लग्न केलं होतं.

रिचा संजयच्या आकंठ प्रेमात होती. त्याच्यासाठी तिने सिनेसृष्टीही सोडली होती. या लव्ह स्टोरीमध्ये तेव्हा वादळ आलं जेव्हा रिचाला ब्रेन ट्युमर असल्याचं समजलं. रिचा आजारावर उपचार करण्यासाठी तीन वर्षांसाठी अमेरिकेत गेली. जेव्हा ती भारतात परतली तेव्हा माधुरी आणि संजयच्या अफेअरबद्दल तिला कळलं.

‘या’ अभिनेत्याने पाच राज्यांत नऊ ट्रक भरून वाटले आयस्क्रीम, कारण...

रिचा यानंतर मानसिकरित्या फार ढासळली. एका मुलाखतीत तिने म्हटलं होतं की, ‘संजय माझ्या आयुष्यात परत यावा असंच मला वाटतं. आम्ही अनेक वर्ष एकमेकांपासून दूर राहत आहोत. मी संजयला विचारलं की त्याला घटस्फोट द्यायचा आहे का? यावर तो नाही असंच म्हणाला. मलाही घटस्फोट नकोय. माझ्या आयुष्यात तो मला परत हवाय. काहीही झालं असलं तरी माझं त्याच्यावर अतोनात प्रेम आहे. मी नेहमीच त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहीन.’

सर्वांसमोर शाहरुखने प्रियांकाला विचारलं, ‘माझ्याशी लग्न करशील का?’, तिनं दिलं हे भन्नाट उत्तर

एकीकडे रिचा आपलं लग्न वाचवण्याचा प्रयत्न करत होती, तर दुसरीकडे तिला पुन्हा ट्युमर झाला. यामुळे रिचाला पुन्हा न्यूयॉर्क जावं लागलं. रिचा आणि संजय यांच्यातलं अंतर एवढं वाढलं की अखेर त्यांनी घटस्फोट घेतला. एका मुलाखतीत संजयची मेहुणी एनाने रिचाचं लग्न तुटण्यामागचं खरं कारण माधुरी दीक्षित असल्याचं म्हटलं होतं.

एना म्हणाली होती की, ‘माधुरीमध्ये अजिबात माणुसकी नाहीये. माधुरीला दुसरं कोणीही भेटलं असतं. पण तिने एका अशा मुलाला निवडलं ज्याचं आधीच लग्न झालंय.’ आपल्या घटस्फोटावर संजयचं काही वेगळंच म्हणणं होतं. 1993 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत संजयने या सर्वाच्यामागे रिचाच्या पालकांना दोषी मानलं.

‘तारक मेहता का..’ मधील अभिनेत्याच्या दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

एका मासिकाशी बोलताना संजयने म्हटलं की, ‘रिचाच्या आजारपणामुळे आमचं नातं तुटलं नाही. हे चुकीचे आरोप आहेत. माझ्या बायकोचे केस गळतात म्हणून मी तिच्यावर प्रेम करणं बंद करीन, मी असा माणूस नक्कीच नाहीये. रिचासोबत आता माझा कोणताही संबंध नाही. आम्ही आता परत कधीच एकत्र येणार नाही. माझी रिचाशी कोणतीच तक्रार नाही. पण आम्हाला वेगळं करण्यात तिच्या आई- वडिलांचा पूर्ण हात होता.’

संजय दत्त पुढे म्हणाला की, ‘आमच्या दोघांच्या आयुष्यात ते फार दखल द्यायचे. माझ्यावर सतत काही ना काही आरोप लावायचे. आमचं नातं तुटायला रिचाच्या बहिणीचा एनाचा फार मोठा हात आहे. आमच्या दोघांमध्य तिच गैरसमज निर्माण करत होती. प्रॉब्लेम माझ्या आणि रिचामधले होते. आमच्यामध्ये कोणाला नमतं घ्यायचं होतं तर आम्ही घेतलंही असतं. पण आमच्यात बोलण्याचा एनाला काय अधिकार होता?’

'तू तुझी स्वस्तातली पब्लिसीटी कर, ती एक मुलाखत देईल आणि...', कंगना- ऋतिक वादाला आता नवं वळण

आपल्या आणि रिचाच्या नात्याबद्दल बोलताना संजय म्हणाला होता की, ‘जेव्हा तिला कर्करोग झाला नव्हता त्याआधीपासूनच ती सतत सांगायची की तिला भारतात रहायला आवडत नाही. न्यूयॉर्कमध्ये माझे बाबा असे आहेत... तसे आहेत... तसंच माझं काम तिला आवडायचंही नाही. तू रात्री 10 पर्यंत का काम करतोस.. रात्री 8 वाजताच घरी का येत नाहीस असे अनेक प्रश्न ती मला विचारायची.’

‘तीही एक अभिनेत्री होती, तिला हे माहीत होतं की, सिनेसृष्टीतलं काम कसं चालतं. लोकांना वाटतं की, ती आजारी पडल्यामुळे आमच्या नात्यात अंतर आलं. पण मला वाटतं की, तिचं आजारपण आम्हाला अजून जवळ घेऊन आलं होतं. पण तिच्या कुटुंबाने सर्व मातीमोल केलं.’

आता सरोगसीद्वारे बाबा होण्याचं प्लॅनिंग करतोय सलमान खान?

पुन्हा एकदा रिचाशी नातं जोडायला तयार आहात का असा प्रश्न संजयला विचारला असता तो म्हणाला की, ‘आम्ही गेली कित्येक वर्ष चांगल्या मित्रांप्रमाणे रहात आहोत. मी नेहमीच तिची इज्जत करतो आणि मला तिची काळजीही आहे. आमचं नातं तुटायला ती एकटी जबाबदार नाही. मीही आहे. पण आता हे नातं पुन्हा जुळू शकत नाही. मला लग्नाची भीती वाटू लागली आहे.’

दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO

First published: May 10, 2019, 3:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading