मुंबई, 10 मे : अभिनेत्री मलायका अरोरा मागच्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरशी असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. बऱ्याच काळापासून या दोघांच्या लग्नाच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. मात्र या दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबुली अद्याप दिलेली नाही. प्रसारमाध्यमांनी त्यांना लग्नाबाबत प्रश्न केल्यावर मात्र या दोघांनीही अद्याप लग्न करणार नसल्याचं सांगितलं. त्यांनी नेहमीच सध्यातरी असा कोणताही प्लान नसल्याचं म्हणत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळलं. अशातच मलायकानं घातलेल्या एका टी-शर्टमुळे आता मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर नुकतेच मलायकाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यात मलायका योगा क्लासमधून बाहेर पडताना दिसत आहे. तिच्या सोबत तिची बहिणही या फोटोमध्ये दिसत आहे. पण या सर्वात लक्ष वेधून घेतोय तो मलायकाचा टी-शर्ट. या टी-शर्टवर एक ब्रेक झालेलं हार्टशेप असून त्याखाली काहीतरी मेसेज लिहिलेला आहे. मलायकाचा हा फोटो तिच्या एका फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला. या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा भडिमार सुरु झाला आहे. या फोटोवरून अर्जुन आणि मलायकाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. याआधी मलायकाच्या अर्जुनच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या काळात मलायका पूर्ण हार्टशेप असलेलं टीशर्ट घालून फिरताना दिसली होती. ज्यावर LOVE असं लिहिलं होतं आणि चाहत्यांनी याचा संबंध अर्जुन कपूरसोबत जोडला होता. मलायका अरोरानं 2017मध्ये अरबाज खानशी असलेला 18 वर्षांचा संसार तोडत घटस्फोट घेतला होता. त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्तानं सगळीकडेच खळबळ माजली होती. त्यानंतर काही काळानं तिचं नाव अर्जुन कपूरशी जोडलं जाऊ लागलं. तर अरबाज खाननं जॉर्जिया एंड्रियानीशी रिलेशनशिपमध्ये असल्याची कबूली दिली. त्यामुळे आता या ब्रेकअपच्या चर्चांवर अर्जुन आणि मलायका काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बॉलिवूडच्या ‘या’ ऑनस्क्रीन बहिणी प्रत्यक्षात एकमेकीचं तोंडही पाहात नव्हत्या, पण…
इराच्या इन्स्टाग्राम पोस्टमधील ‘तो’ होणार का आमिर खानचा जावई ? ‘या’ सुपरस्टारकडे आहे कोट्यवधींचा व्हिला आमिर-सलमानकडेही नाही एवढी संपत्ती
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.