मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ध्वनीनं 21व्या वर्षी केला अनोखा रेकॉर्ड; ठरली देशातील सर्वात लोकप्रिय गायिका

ध्वनीनं 21व्या वर्षी केला अनोखा रेकॉर्ड; ठरली देशातील सर्वात लोकप्रिय गायिका

 23 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया तिनं केलेल्या एका अनोख्या विक्रमाविषयी. हा विक्रम करणारी ती भारतातील पहिली गायिका ठरली आहे.

23 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया तिनं केलेल्या एका अनोख्या विक्रमाविषयी. हा विक्रम करणारी ती भारतातील पहिली गायिका ठरली आहे.

23 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया तिनं केलेल्या एका अनोख्या विक्रमाविषयी. हा विक्रम करणारी ती भारतातील पहिली गायिका ठरली आहे.

मुंबई 22 मार्च: ध्वनी भानुषाली (Dhvani Bhanushali) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय गायिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ‘दिलबर दिलबर’, ‘लेजा रे’, ‘मै तेरी हू’ (‘Dilbar Dilbar’, ‘Leja Re’, ‘Main Teri Hu’) यांसारखी अनेक गाणी गाऊन अत्यंत कमी कालावधीत या गायिकेनं स्वत:ची अशी एक ओळख निर्माण केली आहे. (Dhvani Bhanushali Career) ध्वनीचा आज वाढदिवस आहे. 23 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेऊया तिनं केलेल्या एका अनोख्या विक्रमाविषयी. हा विक्रम करणारी ती भारतातील पहिली गायिका ठरली आहे.

ध्वनीनं 2017 साली टी सीरिजच्या बद्रिनाथ की दुल्हनिया या चित्रपटातील गाणी गाऊन आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 2019 मध्ये टी सीरिजनं तिच्या लेजा ले जारे आणि वास्ते या गाण्यांचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. सोबतच त्यांनी या गाण्याच्या लिंक्स देखील दिल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे या गाण्यांना काही तासांत 100 कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले. इंटरनेटत्या इतिहासात वयाच्या 21 व्या वर्षी 100 कोटींचा पल्ला गाठणारी ती जगातील पहिली गायिका ठरली होती. यापूर्वी असा विक्रम कोणीही केला नव्हता. अन् या विक्रमानंतर ध्वनी रातोरात सुपरस्टार झाली.

अवश्य पाहा - जॉनवर आली तिकिटं विकण्याची वेळ; ‘मुंबई सागा’कडं प्रेक्षकांनी फिरवली पाठ

ध्वनीचा जन्म 22 मार्च 1998 साली मुंबईत झाला होता. लहानपणापासूनच तिला गाण्याची प्रचंड आवड होती. अन् संगीत क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय तिनं घेतला होता. विविध शालेय कार्यक्रमांमध्ये गाणी गात तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तिचा सुरेल आवाज ऐकून टीसीरिजनं तिला बद्रिनाथ की दुल्हनिया या चित्रपटात गाण्याची संधी दिली. दिलबर दिलबर या गाण्यामुळं ध्वनी खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती. तिनं आतापर्यंत 'वेलकम टू न्‍यूयार्क', 'वीरे दी वेडिंग', 'सत्यमेव जयते', 'लुका छुपी' आणि 'मरजावां' या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Dhvani bhanushali, Entertainment, Funny video, Singer, World record