जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / जॉनवर आली तिकिटं विकण्याची वेळ; ‘मुंबई सागा’कडं प्रेक्षकांनी फिरवली पाठ

जॉनवर आली तिकिटं विकण्याची वेळ; ‘मुंबई सागा’कडं प्रेक्षकांनी फिरवली पाठ

जॉनवर आली तिकिटं विकण्याची वेळ; ‘मुंबई सागा’कडं प्रेक्षकांनी फिरवली पाठ

पहिल्या दोन दिवसात केवळ 5 कोटी 25 लाख रुपये इतकीच कमाई हा चित्रपट करु शकला. परिणामी आता स्वत: जॉन काउंटरवर बसून तिकिटाची विक्री करताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 21 मार्च**:** जॉन अब्राहमचा (John Abraham) ‘मुंबई सागा’ (Mumbai Saga) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. कोरोना विषाणूमुळं गेले अनेक महिने सिनेमागृह बंद होती. परंतु मुंबई सागाच्या निमित्तानं पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपट सिनेमागृहात झळकू लागले आहेत. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दोन दिवसात केवळ 5 कोटी 25 लाख रुपये इतकीच कमाई हा चित्रपट करु शकला. परिणामी आता स्वत: जॉन काउंटरवर बसून तिकिटाची विक्री करताना दिसत आहे. हा व्हिडओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता इमरान हाशमी यानं मुंबई सागाचं प्रमोशन करण्यासाठी एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये जॉन आणि इमरान चित्रपटाबाबत माहिती सांगताना दिसत आहे. परंतु त्याचसोबत एका थिएटरच्या काउंटरवर तो चित्रपटाची तिकिटं विकताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जाहिरात

जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांच्या ‘मुंबई सागा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय गुप्तानं केलं आहे. या चित्रपटात जॉन आणि इमरानसोबत काजल अग्रवाल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बरस रोनित रॉय, गुलशन ग्रोवर आणि अमोल गुप्ते हे कलाकार देखील आहेत. या चित्रपटाचे बजेट 60 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट 2100 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असल्याचे म्हटले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात