मुंबई, 17 ऑक्टोबर : ‘डोर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री गुल पनाग नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. अभिनय क्षेत्रानंतर गुल पनागनं राजकीय क्षेत्राताही आपलं नशीब आजमावून पाहिलं होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीकडून चंदीगढ़ची उमेद्वार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता ती एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण तिच्या या व्हिडीओला पंतप्रधान मोदींनी रिप्लाय दिला आहे. गुल पनागनं नुकताच तिच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती आपल्या मुलाला एका मासिकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दाखवून हे कोण आहेत असं विचारताना दिसत आहे. त्यावर तिचा मुलगा म्हणतो, ‘मोदी’ पण पनाग त्याची चूक दुरुस्त करत त्याला ‘मोदी जी’ असं म्हणायला लावते. …म्हणून लिव्ह इनमध्ये राहिलो नाही, रणवीरसोबतच्या नात्यावर दीपिकाचा नवा खुलासा
So Nihal now promptly identifies @narendramodi in magazines & newspapers. Gleefully pointing him out me - often first thing in the morning. I managed to make him do it 'for the camera'. @Openthemag pic.twitter.com/lQCLWqQOeZ
— Gul Panag (@GulPanag) October 16, 2019
हा व्हिडीओ शेअर करताना गुल पनागनं लिहिलं, निहाल आता कोणत्याही मासिक किंवा वर्तमान पत्रात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो बरोबर ओळखतो अणि आनंदानं त्यांच्याकडे बोट दाखवून मला सांगत असतो. हल्ली प्रत्येक सकाळी असं होतं. पण यावेळी मी हा क्षण कॅमेऱ्य़ात कॅप्शन करण्यात यशस्वी झाले. या पोस्टमध्ये तिनं पंतप्रधान मोदींना टॅग केलं होतं. सलमान-ऐश्वर्याचा हा किस्सा तुम्ही वाचलाच नसेल, बॉलिवूड अभिनेत्रीनं उलगडलं गुपित!
गुल पनागचा हा व्हिडीओ पाहिल्यावर पंतप्रधान मोदींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं, ‘खूपच गोड… छोट्या निहालला माझे आशीर्वाद तो आयुष्यात जे काही करू इच्छितो त्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे की, या मुलाच्या तुमच्या रूपात नक्कीच एक खूप चांगली मार्गदर्शक आणि मेंटर मिळेल.’ KBC 11 : करोडपती झाल्यावर बिघडली गौतम झा यांची तब्बेत, वाचा नेमकं काय घडलं ============================================================ VIDEO: अजगराच्या विळख्यातून मजुराच्या सुटकेचा थरार