मुंबई : बॉलिवूडची बहुचर्चित जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह मागच्या काळात वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहेत. कधी त्यांची ड्रेसिंग स्टाइल तर कधी दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या अफवा. नुकतंच दीपिकानं हार्पर्स बाजार यूएस या मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं. त्यासोबतच तिची एक एक्सक्ल्युसिव्ह मुलाखतही या मासिकात छापण्यात आली. ज्यात तिनं तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. याशिवाय लग्नाआधी रणवीरसोबत लिव्ह इनमध्ये न राहण्यामागचं कारणही तिनं यावेळी स्पष्ट केलं. दीपिका म्हणाली, आम्ही दोघंही कामानिमित्त सतत प्रवास करत होतो. तसेच आम्हाला आमच्या परंपरांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं. खास करुन माझ्यासाठी असं करणं अजिबातच सोपं नव्हतं. कारण रणवीर कोणत्याही स्थिती माझ्यासोबत राहायला तयार होता. तो नेहमीच सांगत असे की, ज्या गोष्टीमध्ये तुला आनंद वाटतो त्या गोष्टींमध्ये मी खूश आहे. पण मला वाटत होतं की, हे सर्व एका विशिष्ट वेळी करणं ठिक आहे. ज्याप्रमाणे मी माझ्या आई-वडिलांना सर्व गोष्टी हँडल करताना पाहिलं होतं त्याप्रमाणे मी माझ्या लाइफमध्ये तसंच करू इच्छित होते. मला याशिवाय आणखी काही रस्ता माहित नव्हता. सलमान-ऐश्वर्याचा हा किस्सा तुम्ही वाचलाच नसेल, बॉलिवूड अभिनेत्रीनं उलगडलं गुपित!
दीपिका पुढे सांगते, मी माझ्या कुटुंबाच्या परंपरांच्या विरोधात जाऊन काही करायचं नाही. तसेच जेव्हा आमचं लग्न झालं त्यानंतर आम्ही एकत्र राहायला लागलो तेव्हा एकमेकांना जाणून घेण्यासाठी मला खूप जास्त वेळ मिळाला. जर आम्ही लिव्ह इनमध्ये राहिलो असतो तर भविष्यात एकमेकांबद्दल जाणून घ्यावं असं काहीही उरलं नसतं. मागच्या एका वर्षात आम्ही जे काही केलं त्या सगळ्याला आम्ही मुकलो असतो. त्यामुळे मला आता माझ्या निर्णयावर अभिमान वाटतो. आम्ही वैवहिक जीवनाचा पूर्ण आनंद घेत आहोत. KBC 11 : करोडपती झाल्यावर बिघडली गौतम झा यांची तब्बेत, वाचा नेमकं काय घडलं डिप्रेशनवर पुन्हा बोलली दीपिका दीपिकानं या मुलाखतीत पुन्हा एकदा आपल्या डिप्रेशनचा उल्लेख केला. ती म्हणाली, 2014 मध्ये माझ्या आईनं ओळखलं की मी डिप्रेशनमध्ये आहे. माझं रडणं थांबत नव्हतं. त्यावेळी मला आईनं विचारलं, याचं कारण तुझी रिलेशनशिप आहे की तुझं काम? यावर मी तिला सांगितलं की यातलं काहीही नाही. मी सतत नाही, नाही, मला माहित नाही. मला अजिबात माहित नाही असं म्हणत होते मात्र मला माहित होतं की मला आतून पूर्णपणे एकटं वाटत होतं. शेवटी माझ्या आईनं मला यातून बाहेर येण्यासाठी मदत केली. मी तिच्याकडे मदत मागितली त्यावेळी तिनं अजिबात वाद घातला नाही.
दीपिका लवकरच मेघना गुलजारच्या छपाक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील दिल्लीच्या लक्ष्मी अग्रवालची व्यक्तीरेखा साकारत आहे. याशिवाय ती रणवीर सिंह सोबत ‘83’ मध्येही दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान करत असून दीपिका कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे. Indian Idol च्या ऑडिशनमध्ये स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं KISS केलं आणि… ======================================================== VIDEO: अजगराच्या विळख्यातून मजुराच्या सुटकेचा थरार