जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / KBC 11 : करोडपती झाल्यावर बिघडली गौतम झा यांची तब्बेत, वाचा नेमकं काय घडलं

KBC 11 : करोडपती झाल्यावर बिघडली गौतम झा यांची तब्बेत, वाचा नेमकं काय घडलं

KBC 11 : करोडपती झाल्यावर बिघडली गौतम झा यांची तब्बेत, वाचा नेमकं काय घडलं

फक्त आपल्या पत्नीचं मन राखण्यासाठी गौतम कुमार झा यांनी या शोमध्ये भाग घेतला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 ऑक्टोबर : ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये बुधवारी नव्या करोडपतीची घोषणा झाली. अमिताभ बच्चन यांनी केबीसी 11 च्या तिसरे करोडपती गौतम झा यांचं नाव घेतलं. बिहारच्या गौतम कुमार झा यांनी शानदार अंदाजात खेळ खेळत एक कोटीची रक्कम जिंकली. खरं तर 50 लाखाच्या प्रश्नावर गौतम यांनी सर्व लाइफ लाइन वापरल्या होत्या. मात्र 1 कोटीच्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्यात ते यशस्वी ठरले. लाइफलाइन नसताना त्यांनी 1 कोटीच्या प्रश्नासाठी रिस्क घेतली. जर त्यांचा अंदाज चुकीचा ठरला असता तर त्यांना फक्त 3.20 लाख रुपयांवरच समाधान मानावं लागलं असतं. पण उत्तराची खात्री नसतानाही त्यांनी D हा पर्याय निवडला आणि करोडपती झाले. गौमत कुमार यांनी सांगितलं की, ते केबीसीचे चाहते नाहीत. इतकंच नाही तर त्यांनी कधीच या शोमध्ये येण्याविषयी विचारही केला नव्हता. फक्त आपल्या पत्नीचं मन राखण्यासाठी त्यांनी या शोमध्ये भाग घेतला होता. त्यांच्या पत्नीला नेहमी असं वाटत असे की त्यांचं जनरल नॉलेज खूप चांगलं आहे आणि केबीसीमध्ये ते नक्कीच करोडपती होतील. Indian Idol च्या ऑडिशनमध्ये स्पर्धकानं नेहा कक्करला जबरदस्तीनं KISS केलं आणि…

जाहिरात

आपल्या पत्नीच्या इच्छेसाठी गौतम यांनी केबीसीमध्ये भाग घेतला. याआधी ते UPSC ची तयारी करत होते. आताही त्यांनी आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवलं आहे. सध्या ते सरकारी कर्मचारी आहेत. IIT खडगपुरमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर गौतम यांना पश्चिम बंगालमध्ये रेल्वे खात्यात सिनिअर इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाली. त्यांना आजही शिक्षणाचं वेड आहे मात्र केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी ते तितकेसे उत्सुक नव्हते. प्रियांकाच्या सिनेमातील ‘या’ सीनमुळे निकला कोसळलं होतं रडू! गौतम जेव्हा केबीसी खेळत होते त्यावेळी ते उत्साहित नाहीत हे स्पष्ट दिसत होतं. जेव्हा त्यांनी 1 कोटी जिंकल्याचं अमिताभ यांनी सांगितलं त्यावेळीही ते उत्साहानं उठले नाही. शेवटी अमिताभ यांनी स्वतः उठत त्यांचं अभिनंदन केलं त्यावेळी ते उठून उभे राहिले. OMG! भावाला मुलींसोबत डान्स करताना पाहून नेहा कक्करनं काढली चप्पल अचानक श्वास घेताना होऊ लागला त्रास संपूर्ण खेळात शांत राहिलेले गौतम झा करोडपती झाल्यावरही तेवढेच शांत होते. पण अचानकपणे त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्यांची तब्बेत एवढी बिघडली की त्याना पाण्याचा ग्लास उचलून पाणीही पिता येणं शक्य नव्हतं. त्यांनी पाणी पिण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना जास्तच त्रास होऊ लागला शेवटी अमिताभ यांनी त्यांच्या पत्नीला मंचावर बोलवलं आणि त्यांना पाणी द्यायला लावलं. त्यानंतर काही वेळानं गौतम ठीक झाले. ===================================================== VIDEO: अजगराच्या विळख्यातून मजुराच्या सुटकेचा थरार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात