जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : 'जितने का मजा तब आता है जब...' PM Narendra Modi नवा ट्रेलर रिलीज

VIDEO : 'जितने का मजा तब आता है जब...' PM Narendra Modi नवा ट्रेलर रिलीज

VIDEO : 'जितने का मजा तब आता है जब...' PM Narendra Modi नवा ट्रेलर रिलीज

निवडणूक आयोगानं बंदी घातल्यानं प्रदर्शन लांबणीवर पडलेल्या ‘PM Narendra Modi’ चा नवा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा सिनेमा येत्या 24 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुबंई, 21 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘PM Narendra Modi’ चा नवा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. अभिनेता विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाचा नवा ट्रेलर आधीच्या ट्रेलरपेक्षा जास्त दमदार असल्याचं दिसून येतं. मागच्या ट्रेलरपेक्षा या नव्यानं रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये जवळपास सर्वच गोष्टी नव्या आहेत. या ट्रेलरमध्ये यावेळी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांचा लुकही दाखवण्यात आला आहे. तसेच अनेक संवाद आणि बॅकग्राउंड म्यूझिकही वेगळं आहे. तसेच यामध्ये अनेक नवे खुलासे करण्यात आले आहेत.

    ओमंग कुमार यांचं दिग्दर्शन असलेला ‘PM Narendra Modi’ हा सिनेमा लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर 24 मे ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. याआधी हा सिनेमा 12 एप्रिलला रिलीज होणार होता मात्र निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होईपर्यंत या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. विरोधी पक्षानं या सिनेमाची निर्मिती फक्त मोदी आणि भाजपच्या कलानं करण्यात आल्याचा आरोप केला आणि त्यामुळे हे प्रकरण काही काळासाठी कोर्टातही गेलं पण एवढं सर्व झाल्यावरही या सिनेमाच्या प्रदर्शनावरील बंदी कायम राहीली. …म्हणून सलमाननं विवेकला केले होते तब्बल 41 कॉल, विवेकच्या ‘या’ कृतीमुळे भडकली होती ऐश्वर्या आता लोकसभा निवडणुकांच्या 7 टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं असून 23 मे दिवशी मतदानाचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर लगेच 24 मार्चला हा सिनेमा रिलीज होणार आहे. नव्या ट्रेलरबाबत बोलायचं तर या ट्रेलरनं यावेळी जास्त स्पष्ट शब्दात काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचं आयुष्य मोठ्या पडद्यावर कसं दखवण्यात आलं आहे आणि मोदींच्या भूमिकेला अभिनेता विवेक ओबेरॉयनं कितपत न्याय दिला आहे याविषयी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. याशिवाय या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होतं याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अखेर ऐश्वर्यासमोर पुन्हा एकदा नमला विवेक ओबेरॉय, अशी मागितली जाहीर माफी चुलत बहिणीनेच जितेंद्रवर केले होते लैंगिक शोषणाचे आरोप, अखेर न्यायालयाने दिला हा निर्णय

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात