चुलत बहिणीनेच जितेंद्रवर केले होते लैंगिक शोषणाचे आरोप, अखेर न्यायालयाने दिला हा निर्णय

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारी २०१८ मध्ये जितेंद्र यांच्या चुलत बहिणीनेच त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 10:43 AM IST

चुलत बहिणीनेच जितेंद्रवर केले होते लैंगिक शोषणाचे आरोप, अखेर न्यायालयाने दिला हा निर्णय

शिमला, 21 मे- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ४७ वर्ष जुन्या बलात्कार प्रकरणात त्यांच्याविरोधात केलेल्या FIR ला हिमाचल हायकोर्टाने रद्द केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारी २०१८ मध्ये जितेंद्र यांच्या चुलत बहिणीनेच त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यामुळे जितेंद्र यांच्यावर भारतीय दंडाधिकार कायद्यानुसार कलम ३५४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली होती.

अखेर ऐश्वर्यासमोर पुन्हा एकदा नमला विवेक ओबेरॉय, अशी मागितली जाहीर माफी

जितेंद्र यांच्या वकीलाने या सर्व गोष्टी ब्लॅकमेल करण्यासाठी केल्या जात असल्याचं म्हटलं होतं. ४७ वर्षांनंतर तक्रार नोंदवण्यात आली होती. तक्रार नोंदवायला एवढा उशीर का झाला याचं कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. याशिवाय जितेंद्र म्हणाले की, शिमला येथील हॉटेलचा तसेच कोणत्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं याचा उल्लेखही केला नाही. तसेच दोन सह-कलाकारांची नावंही लिहिण्यात आलेली नाहीत.  यामुळे चुलत बहिणीने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच न्यायालयाने महिलेने केलेल्या तक्रारीत विसंगती असल्याचे लक्षात येता न्यायालयाने जितेंद्र यांच्या विरोधात झालेली एफआयआर रद्द केली.

सनी लिओनी नाही तर 'या' अभिनेत्रीला पहिल्याच ऑडिशनला करावा लागला होता सेक्स सीन

हे आहे पूर्ण प्रकरण-

Loading...

महिलेने हिमाचल डीजीपी यांना लेखी पत्र लिहित जितेंद्र यांच्यावर आरोप केले होते की, १९७१ मधील ही घटना आहे. तेव्हा मी फक्त १८ वर्षांची होते आणि जितेंद्र २८ वर्षांचे होते. ते आपल्या दोन सहकलाकारांसोबत आणि ड्रायव्हरसोबत आले होते. त्यांनी कारमधून मला दिल्लीवरून शिमल्यापर्यंत नेलं. जेव्हा आम्ही शिमल्याला पोहोचलो तेव्हा ते सरळ मला हॉटेलवर घेऊन गेले. जितेंद्र म्हणाले की ते बाहेर फिरायला जात असून, लवकर परत येतील. मी फार थकलेले होते, त्यामुळे मी झोपून गेले. जितेंद्र दारू पिऊन मध्यरात्री आले. ते जेव्हा आले तेव्हा मी झोपले होते. त्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी माझ्यावर जबरदस्तीही केली.

लग्नानंतर एकटीच हनिमूनला गेली होती 'या' अभिनेत्याची पत्नी

SPECIAL REPORT: एक्झिट पोलनंतर सोशल मीडियावर मीम्सला उधाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jitendra
First Published: May 21, 2019 10:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...