मुंबई**, 09** मार्च : बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) अनेकांची आवडती अभिनेत्री आहे. इंडस्ट्रीमध्ये तिने अनेक महत्त्वाच्या आणि लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या आहेत. ‘कभी खुशी कभी गम’मधील ‘पू’ असो किंवा ‘जब वी मेट’मधली ‘गीत’. बॉलिवुडची बेबो नेहमी प्रेक्षकांसाठी नवनवीन भूमिका ती घेऊन आली आहे. या काळात तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागलं. तैमुरच्या जन्मानंतर ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुन्हा येईल की नाही, अशा उलटसुलट चर्चा देखील रंगल्या. मात्र करीनाने सर्व काही बॅलन्स करत तैमुरच्या जन्मानंतर सुद्धा चित्रपट करणं सोडलं नाही. आता ती ‘अंग्रेजी मीडियम’मध्ये सुद्धा दिसणार आहे. (हे वाचा- कोरोनाची भीती कायम, सेलिब्रिटी कपलवर आली लग्न पुढे ढकलायची वेळ ) दरम्यान, करीनाच्या चाहत्यांना तिचे सर्वच चित्रपट आवडतात. मात्र काही चित्रपटातील काही दृश्य तिच्यासाठी खास आहेत. याबाबत स्वत: बेबोने खुलासा केला आहे. यामध्ये तिने दिलेल्या एका इंटिमेट सीनचा देखील समावेश आहे. तिने नुकतच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या या सर्वात आवडत्या इंटिमेट सीनबद्दल सांगितलं आहे. अनुपमा चोपडा यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये करीना बोलत होती. यावेळी जेव्हा 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरॉईन’ या चित्रपटाचा विषय निघाला त्यावेळी सहाजिकच करीना आणि अर्जून रामरालच्या इंटिमेट सीनची चर्चा झाली. या सीनबद्दल बोलताना करीना म्हणाली की, ‘मी या चित्रपटासाठी सर्वकाही दिलं होतं. या सीनसाठी मी न्यूडपण झाले होते. चित्रपटाला ऑडियन्सकडून कसाही प्रतिसाद मिळाला असला तरीही हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे.’ (हे वाचा- ‘विवाहित स्त्रिया सुखी नाहीत तर…’ महिला दिनानिमित्त मलायकाची पोस्ट VIRAL ) ती पुढे म्हणाली की, ‘ही माझ्यासाठी खूप कठीण भूमिका होती. या दरम्यान घरी आल्यानंतर मला खूप डिस्टर्ब वाटायचे. मला नाही वाटत आता पुन्हा मी याप्रकारचा सिनेमा करू शकेन.’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मधूर भांडारकरचही तिने खूप कौतुक केलं. करीनाने स्पष्ट सांगितलं की, ‘हा सिनेमा माझ्यासाठी खूप जवळचा आहे आणि माझ्या TOP5 लिस्टमध्ये आहे.’ (हे वाचा- ‘थप्पड’ला फ्लॉप म्हटल्यावर अनुभव सिन्हांचा राग अनावर, ट्विटरवर दिल्या शिव्या ) या मुलाखतीमध्ये करीनाने तिचा चित्रपट ‘जब वी मेट’ दरम्यान शाहिद कपूरबरोबर झालेल्या ब्रेकअपबद्दलही वाच्यता केली. याच दरम्यान ‘टशन’चं देखील शूटिंग सुरू होती. करीनाने असा खुलासा केला की, ‘तिला जब वी मेट पेक्षा टशनकडून जास्त अपेक्षा होत्या. याच सिनेमासाठी तिने झिरो साइझ फिगर देखील केली होती. तिच्यासाठी टशन खूप खास चित्रपट आहे कारण याच दरम्यान तिची सैफ अली खानबरोबर ओळख झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.