‘पवित्र रिश्ता 2’: सुशांतच्या जागी दिसणार हा अभिनेता, चाहते म्हणाले...

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रियता मिळवली होती. तर आता मालिकेच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रियता मिळवली होती. तर आता मालिकेच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई 15 जून: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajpoot) जाऊन नुकतच वर्ष उलटलं आहे. सुशांतच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या वर्षपूर्तीला त्याच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तर छोट्या पडद्यावरील सुशांतची प्रचंड लोकप्रिय झालेली मालिका ‘पवित्र रिश्ता 2’ (Pavitra Rishta 2) ची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. तर आता सुशांतच्या जागी नव्या अभिनेत्याचं नाव पुढे आलं आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रियता मिळवली होती. अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांत सिंग राजपूत यांची जोडी प्रेक्षकांना फारच आवडली होती. तर आता मालिकेची निर्माती एकता कपूरने मालिकेच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
  अर्चना आणि मानव ही पात्र प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. अंकिता लोखंडेने साकारलेलं अर्चना हे पात्र तिच पुन्हा साकरणार आहे. तर मानवच्या भूमिकेसाठी अभिनेता शाहीर शेख (Shaheer Sheikh) याची निवड करण्यात आली आहे. शाहीरने आजवर अनेक मालिकांत काम केलं आहे. ‘सलिम अनारकली’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या सुरपरहीट मालिकांमध्ये तो झळकला होता.
  प्रेक्षकांना मालिकेच्या नव्या पर्वाची प्रचंड उत्सुकता आहे. पण सुशांतची जागा कोणीच घेऊ शकणार नाही असही अनेकांनी म्हटलं आहे. याशिवाय मानवच्या पात्रात फक्त सुशांतलाच पाहायचं असल्याचही म्हटलं आहे. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  HBD: कपिल शर्मा...फेम कलाकाराने स्वतःच्या आईवरचं केला होता ड्रग्स देत असल्याचा आरोप

  बालाजी टेलीफिल्म्स या मालिकेची निर्मिती करणार आहे. मालिकेतील इतर कास्टची माहिती अद्याप समोर आलेली नाही.  तेव्हा आता प्रेक्षक पहिल्या भागाप्रमाणेच याही भागाला किती प्रतिसाद देतात हे पाहणं ओत्सुक्याचं ठरेलं.
  Published by:News Digital
  First published: