जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / HBD: कपिल शर्मा...फेम कलाकाराने स्वतःच्या आईवरचं केला होता ड्रग्स देत असल्याचा आरोप

HBD: कपिल शर्मा...फेम कलाकाराने स्वतःच्या आईवरचं केला होता ड्रग्स देत असल्याचा आरोप

HBD: कपिल शर्मा...फेम कलाकाराने स्वतःच्या आईवरचं केला होता ड्रग्स देत असल्याचा आरोप

‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) असो किंवा इतर कॉमेडी शो सिद्धार्थने नेहमीचं लोकांचं मनोरंजन केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 जून- आपला 28 वा वाढदिवस साजरा करणारी ‘सेल्फी मौसी’ अर्थातच कॉमेडीयन सिद्धार्थ सागर (Siddharth Sagar) आपल्या सर्वांनाचं माहिती आहे. ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show)  असो किंवा इतर कॉमेडी शो सिद्धार्थने नेहमीचं लोकांचं मनोरंजन केलं आहे. दुसऱ्यांना पोट धरून हसायला लावणारा हा कलाकार स्वतः आपल्या खाजगी आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंगातून गेला आहे. सिद्धार्थला स्वतः त्याच्या कुटुंबीयांनीचं मानसिक रुग्ण बनवलं होतं. पाहूया काय आहे तो प्रसंग.

जाहिरात

कॉमेडीयन सिद्धार्थ सागरने काही वर्षांपूर्वी मुलाखतीदरम्यान आपल्या आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते. सिद्धार्थने आपली आई आणि कुटुंबिय आपल्याला ड्रग्स देत असल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. सिद्धार्थने म्हटलं होतं, ‘एक वेळ अशी आली होती की माझी तब्येत खूप खालावली होती. मला मानसिक तणाव जाणवत होता. ही गोष्ट जेव्हा मी आपल्या कुटुंबाला सांगितली, तेव्हा मला समजलं की माझं कुटुंबचं मला माझ्या जेवणातून ड्रग्स मिसळून देतात. त्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे. मी एक मानसिक रुग्ण झालो आहे. या लोकांनी माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. असा धक्कादायक खुलासा सिद्धार्थने केला होता. (हे वाचा: HBD: जेव्हा 4 महिने गायब होता सिद्धार्थ; समोर येत केला होता धक्कादायक खुलासा    ) ही गोष्ट तेव्हा सर्वांसमोर आली, जेव्हा सिद्धार्थ बरेच दिवस सर्वांच्या संपर्कातून बाहेर गेला होता. त्यामुळे त्याची जवळची मैत्रीण सौमी सक्सेनाने एक पोस्ट शेयर करत सिद्धार्थ तब्बल चार महिन्यांपासून गायब असल्याची चिंता व्यक्त केली होती. आणि त्याला लवकरात लवकर शोधण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी सिद्धार्थने आपल्या सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेयर करत आपण सुखरूप असल्याचं म्हटलं होतं, मात्र आपल्या आयुष्यात खूप काही घडलं असल्याचं म्हटल होतं. आपण सध्या खुपचं तणावाखाली असल्याचंही म्हटलं होतं. आणि त्यानंतर मध्यामास्मोर येऊन त्याने आपल्या आई आणि कुटुंबांबद्दल हा धक्कादायक खुलासा केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात