लग्नात पतीकडून मिळाला धोका, अभिनेत्रीनं थेट पीएम मोदींकडे केली मदतीची याचना

लग्नात पतीकडून मिळाला धोका, अभिनेत्रीनं थेट पीएम मोदींकडे केली मदतीची याचना

या अभिनेत्रीचा पंतप्रधान मोदींकडे मदत मागतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : भोजपूरी अभिनेत्री नेहा बन्सल हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना करताना दिसत आहे. तसेच ती ढसाडसा रडतानाही दिसत आहे.  पतीनं आपल्याला मारहाण करुन सोडून दिल्याचा आरोप नेहानं केला असून तिचा पती एक अमेरिकन नागरिक असल्यानं आता या प्रकरणात पंतप्रधान मोदींनी आपली मदत करावी अशा मागमी नेहानं केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये नेहा सांगते, मला आई-वडील नाहीत त्यामुळे लग्न आणि पतीचा कुटुंबच माझ्यासाठी सर्वकाही होतं. मात्र माझा पती लग्नानंतर 6 महिन्यानी मला स्वतःसोबत घेऊन जाण्यासा नकार देत आहे. तो एक अमेरिकन नागरिक असून मागच्या 6 महिन्यात त्यानं वेगवेगळी आश्वासन देत माझी फसवणूक केली आणि आता मला पीएम मोदी आणि त्यांच्या कायद्याची भीती वाटत नाही असं म्हणत त्यानं मला स्वतःसोबत न्यायला नकार दिला आहे.

दारूच्या सवयीमुळे करिअरमधून घ्यावा लागला ब्रेक, बॉलिवूड अभिनेत्रीचा गौप्यस्फोट

माझी मदत करा मी 3 दिवसांपासून उपाशी आहे

नेहानं रडत असताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती रडताना दिसत आहे. ती सांगते, 'मी 3 दिवसांपासून काहीही न खाता पोलिस स्टेशनला जात आहे. मोदीजी कृपया माझी मदत करा. माझा पती अमेरिकन नागरिक आहे. 6 महिन्यांपूर्वी आम्ही लग्न केलं. माझे आई-वडील नाहीत. मी माझं सर्वकाही विकून लग्न केलं. पण माझ्या पती माझी जबाबदारी घेण्यास आता नकार दिला आहे आणि आज माझ्या घरी तोड-फोड करून निघून गेला.'

लिसा हेडननं बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

अमेरिकन नागरिक आहे नेहाचा पती

नेहा सांगते, माझ्या पतिकडे अमेरिकेचं नागरिकत्व आहे. त्यामुळे तो मला धमकी देत आहे की भारतातील कायदा त्याचं काहीही बिघडवू शकत नाही. त्यानं मला स्वतःसोबत नेण्यास आणि संसार करण्यास नकार दिला आहे. मी भारतात जन्माला आले हा माझा दोष आहे का? की भारत अमेरिकेला घाबरतो? भारताच्या कायद्याचं काहीही महत्त्व नाही का?

...अन् अचानक ललित प्रभाकरने सर्वांसमोर पर्ण पेठेला उचलून मेकअप रूममध्ये नेलं!

माझ्या पतीला पळून जाण्यापासून थांबवा

नेहा पुढे म्हणाली, माझ्या पतीची आई, बहिण आणि बहिणीचा पती त्याला आणि मला भेटू देत नाहीत. आता तो अमेरिकेला निघून जाण्याच्या विचारात आहे. जर त्यानं असं केलं तर माझ्याकडे आत्महत्या करण्यापलिकडे कोणताच पर्याय नाही. 4 दिवसांनंतर माझा पहिला करवाचौथ आहे. मोदीजी मी तुम्हाला विनंती करते की त्यांनी माझ्या पतीला पळून जाण्यापासून थांबवा.

================================================================

पवारांचा हाच तो VIDEO; ज्यावर PM मोदींनी केली खुमासदार टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 04:51 PM IST

ताज्या बातम्या