मुंबई, 25 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा पठाण आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झालाय. 4.19 लाखांच्या अँडवान्स बुकींगसह सिनेमा पहिल्याच दिवशी फाऊसफुल्ल झालाय. दरम्यान शाहरुखच्या चाहत्यांनी पठाणच्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. मुंबईसह पुणे तसेच सांगलीमध्ये देखील प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी पठाणला डोक्यावर घेतलं आहे. सांगलीकरांनी तर पठाणचं जंगी सेलिब्रेशन केलंय.
सांगलीत आज पठाण सिनेमाला बजरंग दलाने विरोध दर्शवला आहे. सांगलीत बजरंग दलाने औरम सिनेमागृहाला निवेदन देऊन सिनेमा प्रदर्शित करू नये अशी विनंती केली आहे. अशातच एस आर के फॅन क्लबने विजयनगर येथील औरम थिएटरच बुक केल आहे. 110 तिकीट बुक केले आहेत. यावेळी चाहत्यांनी केक कापून जल्लोष साजरा केला.
हेही वाचा - Pathaan Release : अखेर शाहरुखचा 'पठाण' रिलीज! मुंबईसह पुण्यातील थिएटर बाहेर पोलीस सुरक्षा
पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी थिएटरच्या बाहेर आणि आत सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षाकंनी गर्दी केली होती. राज्यभराप्रमाणे आज सांगलीतील पठाण सिनेमा प्रदर्शित झाला आहे. मात्र या सिनेमाला विरोध होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सकाळी नऊ पंचेचाळीस वाजता विजयनगर येथील ओरम सिनेमागृहात पठाण सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
पठाण सिनेमानं रिलीजच्या आधीच 4.19 लाखांहून अधिक अँडवान्स बुकींग झालं आहे. पठाण सिनेमा 45-50 कोटींचं ओपनिंग कलेक्शन करेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पठाण सिनेमातील बेशरम रंग गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र विरोधानंतरही सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करण्यात यशस्वी ठरेल असं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News