मुंबई, 01 एप्रिल : बॉलिवूड सेलेब्रिटी, राजकीय व्यक्तींचं खासगी आयुष्य सर्वसामान्यांसाठी औत्सुक्याचा, चर्चेचा विषय असतो. हे सेलेब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या खासगी जीवनातील घडामोडी चाहत्यांसाठी शेअर करत असतात. सेलेब्रिटींच्या अशा पोस्टला चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळतो. सध्या असेच दोन सेलेब्रिटी जोरदार चर्चेत आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते, खासदार राघव चढ्ढा यांचे अफेअर असून, ते लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे. या दोघांकडे कोट्यवधींची संपत्ती, महागड्या गाड्यांचे कलेक्शन आणि अलिशान घर आहे. परिणिती आणि राघव यांची संपत्ती नेमकी किती आहे, ते जाणून घेऊया. `अमर उजाला`ने याविषयीची माहिती दिली आहे.
हँसी तो फसी, लेडीज व्हर्सेस रिकी बहल, डोर, गोलमाल अगेन, केसरी, कोडनेम : तिरंगा यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये भूमिका साकारत अभिनेत्री परिणिती चोप्राने प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय ती उत्तम गायिकादेखील आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण म्हणूनही तिची ओळख आहे. परिणिती एक यशस्वी अभिनेत्री असून, ती एक प्रसिद्ध सेलेब्रिटी ब्रँड अम्बॅसेडर आणि प्रॉडक्ट स्पोकपर्सनही आहे. या शिवाय तिने 2022 मध्ये टेलिव्हिजन दुनियेत पदार्पण केलं. कलर्स टीव्ही वाहिनीवरील हुनरबाज : देश की शान या रिअलिटी शोमध्ये जज्ज म्हणूनही काम केलं आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच परिणिती आणि राघव विवाहबद्ध होणार असल्याचं बोललं जात आहे. राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा या दोघांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. या दोघांची जीवनशैलीदेखील लक्झुरिअस आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राघव चढ्ढा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 16,50,000 रुपयांची जंगम मालमत्ता असून त्याचे उत्पन्न 2,20,000 रुपये आहे. राघव यांची जीवनशैली अलिशान आहे. राघव चढ्ढा यांच्याकडे मारुती स्विफ्ट डिझायर कार असून तिची किंमत सुमारे 1 लाख 32 रुपये आहे. राघव चढ्ढा हे सीए असून, राजकारणात सक्रिय आहेत.
दुसरीकडे अभिनेत्री परिणिती चोप्रादेखील कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. उच्चशिक्षित असलेल्या परिणितीकडे सुमारे 60 कोटी रुपयांची संपत्ती आहे. चित्रपटांशिवाय जाहिरातीच्या माध्यमातूनही ती कमाई करते. परिणितीचे मुंबईत सुमारे 22 कोटींचे अलिशान घर आहे. तसेच तिच्या अनेक अलिशान गाड्या आहेत. या दोघांच्या विवाहाची चर्चा जोरात सुरू असून, चाहत्यांमध्ये या विषयी मोठी उत्सुकता दिसून येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Parineeti Chopra