जय जय स्वामी समर्थ ही मालिका महाराष्ट्रातील घराघरात पहिली जाते. प्रेक्षक आणि स्वामी भक्तांमध्ये ही मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. गेली दोन वर्ष या मालिकेतून स्वामींच्या लीला दाखवल्या जात आहे.
अक्षयने स्वामी समर्थांच्या भूमिकेत जीव ओतला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्याला आता प्रेक्षक स्वामींच्या रूपातच ओळखतात.
आता जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या संपूर्ण टीमने नुकतेच अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतले आहे.
यावेळी मालिकेतील प्रत्यक्ष स्वामी, चोळप्पा, चंदा आणि दाजीबा या भूमिका साकारणारे कलाकार उपस्थित होते.
अक्कलकोटच्या स्वामी मंदिरात मालिकेच्या टीमने स्वामींचं दर्शन घेतलं. मालिकेच्या टीमची ही अक्कलकोट व्हिजिट चाहत्यांना सुखावत आहे.