मुंबई, 18 नोव्हेंबर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काही वर्षांआधी बायोपिक येऊन गेला. त्यानंतर आता देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. या बायोपिकचं खास वैशिष्ट्य म्हणजे मराठमोळा अभिनेता सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अटलजींची भूमिका साकारणार आहे. नुकतीच सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. दिग्दर्शक रवी जाधव एकामागून एक दमदार सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नुकताच त्यानं ताली या वेब सीरिजची घोषणा केली. त्यानंतर आता देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील आधारीत बायोपिकची घोषणा रवी जाधवनं केली आहे. सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी सिनेमात अटक बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहे. पंकज त्रिपाठीच्या आजवरच्या भूमिकेतील त्यांची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. अटक बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमाची घोषणा करताना रवी जाधवनं मैं रहूं या ना रहूं, ये देश रहना चाहिए हे अटक बिहारींचं वाक्य लिहिलीत म्हटलंय, ‘सर्वोच्च नेता अटल बिहारी वाजपेयी यांची जीवनकथा मोठ्या पडद्यावर मांडण्याचं भाग्य मला लाभलं’. अटल असं सिनेमाचं नाव असून हा सिनेमा ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशन अँड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित असल्याची माहिती समोर आली आहे. हेही वाचा - साडी चोळी, बिंदी अन् 80हून अधिक ट्रान्सजेंडर; Haddiतील नवाजुद्दीनचा नवा लुक समोर
तर अभिनेता पंकज त्रिपाठीनं देखील रवी जाधव आणि टीमबरोबर फोटो शेअर करत म्हटलंय, अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्याची भूमिका करायला मिळणं हे माझं भाग्य आहे. अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक राजकीय नेता नाही तर एक उत्तम कवी आणि लेखकही होते. त्यांची भूमिका मला साकारायला मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दिग्दर्शक रवी जाधवच्या ताली या वेब सीरिजचं शुटींग नुकतंच संपलं आहे. ट्रान्सजेंडर गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये मिस इंडिया अभिनेत्री सुष्मिता सेन ट्रान्सजेंडर गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लुक काही दिवसांआधीच रिलीज करण्यात आला.
त्याआधी रवी जाधवचा टाइमपास 3 हा धम्माल मराठी सिनेमा रिलीज झाला होता. टाइमपास 3 नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. टाइमपासनंतर रवीनं हिंदी सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला आहे. तालीनंतर आता अटल या बायोपिकची सर्वत्र चर्चा सुरू आहे.