'शुध्द देसी मराठी'ची तिसरी वेबसीरिज 'फोमो'; सागर कारंडे, पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत

'शुध्द देसी मराठी'ची तिसरी वेबसीरिज 'फोमो'; सागर कारंडे, पर्ण पेठे दिसणार खास भूमिकेत

फिअर आॅफ मिसिंग आऊट अर्थात फोमो ही गावाकडून आलेल्या तरुणांची गोष्ट आहे.

  • Share this:

मुंबई, 4 नोव्हेंबर : स्त्रिलिंग पुल्लिंग या पुरस्कारप्राप्त मराठी बेव सिरीजच्या नंतर शुध्द देसी मराठी येत्या 5 नोव्हेंबरपासून 'फोमो' ही वेबसिरीज लाँच करत आहे. या नव्या सीरिजच्या डिजीटल प्रिमियरची घोषणा शुद्ध देसी मराठीच्या निर्मात्यांकडून करण्यात आली. फिअर आॅफ मिसिंग आऊट अर्थात फोमो ही गावाकडून आलेल्या तरुणांची गोष्ट आहे.

पुरस्कार विजेती  मराठी मूळ वेबसिरीज 'स्त्रिलिंग पुल्लिंग 3 जानेवारी 2019ला शुद्ध देसी मराठी या YouTube चॅनेलवरून प्रसिद्ध झाली होती. 6 भागांच्या या वेबसिरीजला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. गेल्या 10 महिन्यात तब्बल 104 लाखांहून जास्त व्ह्यूज या वेबसिरीजला मिळाले आहेत. स्त्रिलिंग पुल्लिंग या वेबसिरीजने मोस्ट पॉप्युलर वेबसिरीज या गटात ईटी ब्रँड इक्विटी स्पॉट पुरस्कार २०१९ हा मानाचा पुरस्कारही जिंकला आहे.

फोमो म्हणजे फिअर आॅफ मिसिंग आऊट .. फोमो Fear of Missing out ही अत्यंत साधी सरळ सोपी गोष्ट आहे. एका लहान गावातून मोठ्या शहरात येणाऱ्या आणि या मोठ्या शहरात त्याला सामावून घेण्यासाठी चाललेली धडपड ही फोमोची मूळ कल्पना आहे. समीर (अभिषेक देशमुख) मुंबईत एका रेडिओ चॅनलसाठी काम करतो. रेडिओ स्टेशनवर 2 वर्षांहून अधिक काळ काम करूनही, आॅफिसमधील कोणीही त्याला खरोखर ओळखत नाही हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा हे फोमोचं संकट त्याच्या मानगुटीवर बसतं.

वाचा - जेव्हा हा बॉलिवूड स्टार रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना फाइव्ह स्टारमध्ये घेऊन जातो

ह्या फोमोतून सुटका करून घेण्यासाठी तो जंग जंग पछाडतो. मात्र कितीही केलं तरी ही फोमोची भावना त्याची पाठ सोडत नाही. जेव्हा अशाच फोमोमुळे त्रस्त असलेल्या रेवतीशी (पर्ण पेठे) त्याची ओळख होते. तेव्हा कुठे गोष्टी बदलायला लागतात. ते त्यांच्या परिस्थितीबद्दल काहीतरी करण्याचा निर्णय घेतात आणि कथेला एक आनंददायक वळण घेते. फोमो हे आधुनिक काळातील एक नाटक आहे ज्यात आपण लहान शहरांतून येणाऱ्यांशी कसे वागतो. मग त्यांचं काय होतं आणि त्यांना या त्रासाला कसं तोंड द्यावं लागतं यावर भाष्य करण्याचा या वेबसिरीजमधून प्रयत्न करण्यात आला आहे.

फोमोची टीम

फोमो- गर्दीतले दर्दी या विनोदी वेबसिरीजची निर्मिती शुध्द देसी स्टुडिओजने केली असून सुशांत धारवाडकर आणि चिन्मय कुलकर्णी यांनी या वेबसिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. लिंटासचे माजी क्रिएटीव्ह दिग्दर्शक सुशांत धारवाडकर यांनी जाहिरात विश्वात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडवर तब्बल दहा वर्षांहून जास्त काम केलं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांची ही पहिली मराठी वेब सीरिज आहे. तर चिन्मय कुलकर्णी हे गेली १० वर्ष मराठी आणि हिंदी टीव्हीविश्वात फिक्शन आणि नॉन फिक्शन कार्यक्रमांसाठी लिखाण करीत आहेत. त्यांचीही दिग्दर्शक म्हणून ही पहिलीच वेबसिरीज आहे. पर्ण पेठे, अभिषेक देशमुख, रुचिता जाधव आणि चेतन चिटणीस हे मराठी सिने आणि टीव्ही विश्वातील लोकप्रिय कलाकार फोमो या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत आहेत.लोकप्रिय अभिनेता सागर कारंडेही एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे .

आज वेगाने विकसित होत असलेल्या डिजिटल व्हिडिओ इकोसिस्टममध्ये प्रादेशिक भाषेतील आशय सर्वात आघाडीवर आहे, असं मत शुद्ध देसी मराठी स्टुडिओचे बिझनेस हेड हेमंत जैन यांनी फोमो वेबसिरीजच्या लाँचिंगवेळी मांडले. या डिजीटल युगात 2021 पर्यंत हिंदी भाषेनंतर आशयाच्या  बाबतीत मराठी भाषा ही दुसऱ्या क्रमांकाच्या भाषेचा उदय होण्याची अपेक्षा असल्याने आमचे लक्ष मराठी भाषेतील प्रेक्षकांकडे जास्त आहे.  शुद्ध देसी मराठीच्या माध्यमातून वेगळ्या आणि समकालीन अशा रंजक कथा वेबसिरीजच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा संकल्प असल्याचं हेमंत जैन यांनी पुढे बोलताना सांगितलं.

Video: म्हणून फोटोग्राफर्स दिसताच सारा अली खान पळाली आणि...

वेवसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत नवनवीन कथांची मेजवानी घेऊन येण्यासाठी एक योग्य डिजीटल व्यासपीठ असावं या उद्देशाने शुध्द देसी स्टुडिओची उभारणी करण्यात आली आहे. जास्तीत जास्त मूळ आशयाच्या दर्जेदार बेवसिरीज तयार करणे, डिजिटल प्लॅटफॉर्म आशयाने परिपूर्ण असेल्या वेबसिरीजच्या माध्यमातून उत्तम गुंतवणूक करणं आणि स्थानिक भाषेतील आशयाला जागतिक वितरणाचे नेटवर्क तयार करण्याचे मूळ उद्दिष्ट शुध्द देसी स्टुडिओचं आहे, असं त्याच्या निर्मात्यांनी सांगितलं. मराठीतील पहिली वेबसिरीज स्त्रिलिंग पुल्लिंग जानेवारी 2019 मध्ये लाँच करण्यात आली. तेव्हापासून शुद्ध देसी मराठीचे 2लाख 20 हजार सबस्क्रायबर झाले असून या चॅनेलला दीड कोटीच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत.

----------------------

शिवसेनेबद्दल शरद पवारांचं सूचक विधान, UNCUT पत्रकार परिषद

First published: November 4, 2019, 10:25 PM IST
Tags: web series

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading