जाणून घ्या Netflixवर रीलिज होण्याआधी कसा पाहता येईल Sacred Games 2

जाणून घ्या Netflixवर रीलिज होण्याआधी कसा पाहता येईल Sacred Games 2

Netflixवरील सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरीज Sacred Gamesचा दुसरा भाग येत्या 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच 3 दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट: Netflixवरील सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरीज Sacred Gamesचा दुसरा भाग येत्या 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच 3 दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर सेक्रेड गेम्सचा पहिला भाग तुफान गाजला होता. तब्बल एक वर्ष वाट पाहायला लावल्यानंतर आता Sacred Games 2 भाग प्रदर्शित होत आहे. Netflix प्रेक्षक कधी एकदा ही सीरीज प्रदर्शित होईल याची वाट पाहत आहेत. जे लोक Sacred Games 2ची अतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Sacred Games 2चा भाग एक दिवस आधी म्हणजे 15 ऑगस्ट ऐवजी 14 ऑगस्टलाच पाहायला मिळू शकतो.

यांना मिळणार संधी एक दिवस आधी पाहण्याची

ज्या युजर्सकडे Oneplus स्मार्टफोन आहेत, त्यांना एक दिवस आधीच Sacred Games 2 पाहायला मिळणार आहे. Netflix शनिवारी यासंदर्भात घोषणा केली. Oneplusज्या युझर्सना हा शो ऑफिशल रिलीज होण्याआधीच पाहता येतील. इतक नव्हे तर Oneplus कम्युनिटीच्या मुंबई, दिल्ली आणि बेंगळूरू येथे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले आहे. यासाठी युझर्सना नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्या युझर्सना दिग्दर्शक अनुराग कश्यप सोबत Sacred Games 2चा पहिला भाग पाहता येईल. Netflixने दिलेल्या माहितीनुसार, Sacred Games 2चे स्पेशल स्क्रीनिंग 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. यासाठी आज (12 ऑगस्ट) दुपारी 12पासून तिकिट मिळतील.

सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागात गणेश गायतोंडे (नवाझुद्दीन सिद्दीकी) मेलेला दाखवण्यात आला होता. त्यामुळे सरताज सिंहला संकट टळलं असं वाटत होतं. मात्र सीझन 2 च्या ट्रेलरमध्ये मात्र तो परत आलेला दाखवण्यात आला आहे. तो सरताजला एक मेसेज पाठवतो, ज्यात लिहिलेलं असतं की युद्धाची वेळ आली आहे. मात्र हा मेसेज पाठवणारा कोण आहे हे मात्र कोणालाच माहित नसतं. त्यामुळे सरताज या संकटाचा सामना करायला तयार असतो मात्र त्याचा शत्रू कोण आहे हे मात्र त्याला माहीत नसतं. दमदार संवाद आणि नवाझुद्दीनचा तेवढ्याच ताकदीचा अभिनय या ट्रेलरमध्ये पहायला मिळतो.

'तो' पाठीमागून आला आणि 5 वेळा घातले डोक्यात फावडे, हत्येच्या घटनेचा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: August 12, 2019, 6:27 PM IST

ताज्या बातम्या