Home /News /entertainment /

VIDEO-कथ्थकच्या रियाझासाठी माधुरीला मुलाने दिली तबल्याची साथ,आईच्या साथीने नृत्याचे धडेही गिरवले

VIDEO-कथ्थकच्या रियाझासाठी माधुरीला मुलाने दिली तबल्याची साथ,आईच्या साथीने नृत्याचे धडेही गिरवले

माधुरीने तिचा मुलगा अरिन बरोबर नृत्याची जुगलबंदी करताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सुरूवातीला अरिन माधुरीच्या कथ्थकच्या रियाझामध्ये तबल्याची साथ देताना दिसत आहे. मात्र त्यानंतर माधुरीने त्याला तिच्याबरोबर रियाझ करायला भाग पाडलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 18 एप्रिल : कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे नेहमी आपल्या कामामध्ये व्यस्त असणारी कलाकार मंडळी त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. आता तर लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे सर्वांनाच त्यांच्या कुटुंबाबरोबर अधिक वेळ मिळणार आहे. अभिनेत्री माधुरी दिक्षीतही तिच्या मुलांबरोबर आणि पती डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माधुरीने तिच्या कुटुंबाबरोबरचे अनेक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. (हे वाचा-'ए कोहली पोछा मार ना...' विराट-अनुष्काच्या Video वर बनले मीम्स) सध्या माधुरीने तिचा मुलगा अरिन बरोबर नृत्याची जुगलबंदी करताना एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सुरूवातीला अरिन माधुरीच्या कथ्थकच्या रियाझामध्ये तबल्याची साथ देताना दिसत आहे. मात्र त्यानंतर माधुरीने त्याला तिच्याबरोबर रियाझ करायला भाग पाडलं आहे. अरिन देखील माधुरीच्या साथीने कथ्थकचे काही तोडे गिरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ माधुरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताच त्याला 4 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. इतकी वर्ष परदेशात राहुनही माधुरी तिच्या मुलांना भारतीय संस्कृती शिकवण्यात मागे राहिली नाही आहे. (हे वाचा-सिनेमा करण्यासाठी निर्मात्यांनी ठेवली होती ही अट, 'रामायण'च्या सीतेनं दिला नकार) या व्हिडीओला कॅप्शन देताना माधुरी म्हणाली आहे की, 'क्वारंटाइनमुळे आपल्याला त्या गोष्टी करायला मिळत आहे ज्या आपण नेहमी करू इच्छित होतो. हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा की मला नेहमी काय करायची इच्छा होती.'
    याआधीही माधुरीने क्वारंटाइन टाइम एन्जॉय करताना अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. वर्क आउट करतानाचा किंवा पंतप्रधानांनी दिवे लावण्याचं आवाहन केल्यानंतर दिवे लावल्याचा व्हिडीओ तिच्या फॅन्समध्ये विशेष प्रसिद्ध झाला आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या