अनुष्का शर्माची पहिलीच वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात, लॉकडाऊनमध्ये मिळाली लीगल नोटीस

अनुष्का शर्माची पहिलीच वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात, लॉकडाऊनमध्ये मिळाली लीगल नोटीस

लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी या वेब सीरिजमुळे अनुष्का शर्माला लीगल नोटीस पाठवली आहे. वाचा काय आहे नेमकं प्रकरण...

  • Share this:

मुंबई, 21 मे : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिची बहुचर्चित वेब सीरिज 'पाताललोक' रिलीज झाली. या वेबसीरिज खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या वेबसीरिजच्या कथेची आणि त्यातील भूमिकांची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पण आता ही वेबसीरिज वादात सापडली आहे. लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी या वेब सीरिजमुळे निर्माती अनुष्का शर्माला लीगल नोटीस पाठवली आहे.

अनुष्का शर्माला 18 मे ला पाठवलेल्या या नोटीसमध्ये वीरेन सिंह गुरुंग यांनी या वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला गेला असल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. वीरेन यांनी सांगितलं, या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये 3 मिनिटं आणि 41 सेकंदांच्या चौकशी दरम्यान एक महिला पोलिस संबंधित नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीला जातीवादी शिव्या देते.

प्रतीक्षा संपली! धक धक गर्लचं Candle गाणं 'या' दिवशी होणार रिलीज

वीरेन यांनी सांगितलं की त्यांना नेपाळी शब्द या वेबसीरिजमध्ये वापरल्याबद्दल कोणतीही समस्या नाही. पण त्यानंतर जो शब्द वापरला गेला आहे त्याला त्यांचा विरोध आहे. नेपाळी ही 22 अनुसूचित भाषांपैकी एक आहे आणि भारतात दीड कोटी लोक नेपाळी भाषा बोलतात. भारतात गोरखा समुदाय सर्वाधिक नेपाळी भाषा बोलणारा समुदाय आहे आणि या वेब सीरिजमध्ये वापरलेल्या या शब्दांमुळे त्यांचा अपमान झाल्याचं वीरेन यांचं म्हणणं आहे आणि यासाठी अनुष्कानं माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

'पाताललोक'मध्ये जयदीप अहलावत, नीरज काबी, अभिषेक बनर्जी, स्वस्तिका मुखर्जी, निहारिका, जगजीत, गुल पनाग या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या वेब सीरीजचं लेखन सुदीप शर्मानं केलं आहे. ही वेबसीरिज अमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आली आहे.

सलमानने लॉकडाऊनमध्येच घेतली आई-वडिलांची भेट आणि अवघ्या काही तासात...

पूजा बेदीनं केली गोवा क्वारंटाइन सेंटरची पोलखोल, समोर आला धक्कादायक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2020 09:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading