Home /News /entertainment /

प्रतीक्षा संपली! धक धक गर्लचं Candle गाणं 'या' दिवशी होणार रिलीज

प्रतीक्षा संपली! धक धक गर्लचं Candle गाणं 'या' दिवशी होणार रिलीज

15 मे रोजी आपल्या वाढदिवशी माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit Nene) Candle चा टीझर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता.

    मुंबई, 20 मे : अभिनय, अदा आणि नृत्य यामुळे गेली अनेक दशकं माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit Nene) बॉलिवूडवर राज्य केलं. आपल्या या तिन्ही गोष्टींनी चाहत्यांना घायाळ करणारी धक धक गर्ल आपल्या सुरेल आवाजानंही चाहत्यांना मंत्रमुग्ध करणार आहे. माधुरीनं गायलेलं इंग्रजी गाणं Candle ची प्रतीक्षा आता संपली आहे. 23 मे रोजी हे गाणं रिलीज होणार आहे. 15 मे रोजी आपल्या 53 व्या वाढदिवशी माधुरीने चाहत्यांना खास असं रिटर्न गिफ्ट दिलं होतं.  Candle या आपल्या गाण्याचा टीझर तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर माधुरीचं हे इंग्रजी गाणं कधी रिलीज होणार याची वाट प्रत्येक जण पाहत होता. माधुरीने आता या गाण्याची रिलीज डेटही सांगितली आहे. 23 मे रोजी हे गाणं रिलीज होणार आहे. आपण नृत्य आणि अभियनानंतर गाण्याचाही निर्णय का घेतला याबाबत सांगताना माधुरी म्हणाली, "मी लहानाची मोठी होत असताना संगीत हा आमच्या घरातील एक अविभाज्य असा भाग होता. आयुष्यामध्ये खूप करण्यासाठी संगीतानंच मला प्रेरणा दिली. त्यामुळे माझ्या वाढदिवशी मी माझ्या गाण्याचा टीझर रिलीज करण्याचा निर्णय घेतला" "गेले कित्येक वर्ष माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना गिफ्ट देण्याची ही वेळ आहे, असं मला वाटलं. आपण सर्वजण एका कठिण परिस्थितीतून जात आहोच. त्यामुळे हे गाणं आता रिलीज करणं योग्य आहे, असं आम्ही ठरवलं. संगीत मला खूप सकारात्मकता आणि प्रेरणा देतं. प्रत्येकाला ती मिळावी अशी माझी इच्छा आहे" हे वाचा - कोरोना वॉरियर्स पोलिसांना निवेदिता आणि अशोक सराफ देणार गोड भेट! माधुरीनं आय फॉर इंडिया (I For India) या लॉकडाऊनमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यासाठी पार पडलेल्या कॉन्सर्टमध्ये Ed Sheeran चं 'परफेक्ट' हे गाणं गायलं होतं. त्यावेळी तिच्या गाण्याचे सर्वांनी कौतुक केल्यानंतर आता माधुरी गाण्याकडे गांभीर्याने पाहू लागली आहे. माधुरी आता तिचं स्वत:चं इंग्रजी गाणं घेऊन चाहत्यांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री, डान्सर ते  रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक यानंतर आता तिला एका वेगळ्या भूमिकेत पाहणार आहोत. तिच्या प्रतिभेचा नवा पैलू उलगडताना पाहायला मिळणार आहे. हे वाचा - सलमानने लॉकडाऊनमध्येच घेतली आई-वडिलांची भेट आणि अवघ्या काही तासात...
    Published by:Priya Lad
    First published:

    पुढील बातम्या