सलमान खाननं आपल्या वडिलांच्या तब्येतीबाबत अनेकदा काळजी व्यक्त केली होती. सध्या सलमान त्याच्या पनवेल फार्म हाउसवर आहे. या ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बहीण अर्पिता खान, तिचा पती आयुष शर्मा आणि मुलं सुद्धा आहे. याशिवाय युलिया वंतूर, जॅकलिन फर्नांडिस, भाचा निर्वाण असे आणखी काही लोक सलमानसोबत त्याच्या फार्महाऊसवर थांबले आहेत.
काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांचं 'तेरे बिना' हे अल्बम साँग रिलीज झालं. या गाण्याला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद सुद्धा मिळाला. हे गाणं सलमाननं स्वतः गायलं असून अगदी कमी गोष्टींचा वापर करून सलमानच्याच पनवेल फार्म हाऊस परिसरात या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं आहे. या गाण्यातील सलमान-जॅकलिनच्या केमिस्ट्रीनं चाहत्यांची मनं जिंकली. कोरोना वॉरियर्स पोलिसांना निवेदिता आणि अशोक सराफ देणार गोड भेट! भूटानमध्ये असं काय घडलं की, अनुष्काला अर्ध्या रस्त्यात सोडून पळून गेला विराटView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Salman khan