मुंबई, 18 मार्च- गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु होती. नुकतंच हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाल्याने सर्वांचाच उत्साह बघण्यासारखा होता. एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळाल्याने हे गाणं सध्या चांगलंच चर्चेत आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासूनच या गाण्याने धुमाकूळ घातला होता. आता या गाण्याचं कोल्हापूर कनेक्शन समोर आलं आहे.
'नाटू नाटू' या ऑस्कर विजेत्या गाण्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. RRR या चित्रपटातील गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या गाण्याने ऑस्कर पुरस्कार जिंकून भारतीय चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.या सर्व धामधुमीत एक गोष्ट समोर आली आहे. आणि ती म्हणजे या गाण्याचं कोल्हापूरसोबत खास कनेक्शन आहे. कस ते आम्ही तुम्हाला सांगतो.
(हे वाचा: 'नागपुरात येऊ देणार नाही'; या कारणामुळे Mc stan वर मनसेचा संताप)
या ऑस्कर विजेत्या गाण्यावर व्हीएफएक्सच्या माध्यमातून रुपेरी साज चढवण्याचं काम कोल्हापुरात झालं आहे. त्यामुळे कोल्हापूरच या ऑस्कर पुरस्कार गाण्याशी जवळचं नातं आहे. कोल्हापूरच्या रेलीश इन्फोसॉफ्ट कंपनीत या गाण्याच्या बऱ्याचशा भागावर व्हिएफएक्स इफेक्ट देण्यात आले आहेत. कोल्हापूरच्या मुलांनी या गाण्यावर हा साज चढवल्याने कोल्हापूरकरांसाठी सुद्धा हा अभिमानाचा क्षण आहे.
कोल्हापूर या शाहू नगरीला नेहमीच कला नगरी म्हणून ओळखलं जातं. कोल्हापूरच्या या रांगड्या मातीतून अनेक दिग्गज कलाकार जन्माला आले आहेत. अनेक लोकांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करत देशाचं नाव सातासमुद्रापार नेलं आहे. यामध्ये आता 'आरआरआर'च्या या गाण्याचासुद्धा समावेश झाला आहे.
'नाटू नाटू' या गाण्यातील कलाकारांचा डान्सही तुफान चर्चेत आहे. या गाण्याची रिहर्सल आणि वर्कशॉप तब्बल दोन महिने घेण्यात आली होती. आणि त्यांनतर 15 दिवसांच्या कालावधीत हे गाणं शूट करण्यात आलं होत. तर ऑस्करमध्ये सादर झालेलं हे गाणं 15 दिवसांच्या कालावधीत रिहर्सल करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Kolhapur, Oscar 2023, Oscar Award