मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'नागपुरात येऊ देणार नाही'; या कारणामुळे Mc stan वर मनसेचा संताप

'नागपुरात येऊ देणार नाही'; या कारणामुळे Mc stan वर मनसेचा संताप

Mc Stan News:  'बिग बॉस 16' चा विजेता एमसी स्टॅन सध्या आपल्या शोसाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहे.

Mc Stan News: 'बिग बॉस 16' चा विजेता एमसी स्टॅन सध्या आपल्या शोसाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहे.

Mc Stan News: 'बिग बॉस 16' चा विजेता एमसी स्टॅन सध्या आपल्या शोसाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 18 मार्च- 'बिग बॉस 16' चा विजेता एमसी स्टॅन सध्या आपल्या शोसाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहे. मात्र एमसी स्टॅनला नागपुरात शो करु देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. त्यामुळे एमसी स्टॅनच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज एमसी स्टॅन नागपुरात आपला शो सादर करणार होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतल्याने शो रद्द होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बिग बॉसचा विजेता असणारा ''एमसी स्टॅन हा अंमली पदार्थांचं सेवन करतो. आपल्या गाण्यांमध्ये अश्लील भाषा वापरतो. इतकंच नव्हे तर आपल्या एका रॅपमध्ये त्याने गांजासारख्या पदार्थांचा उल्लेख केला आहे. हे सर्व प्रकार तरुण पिढीला बिघडवणारे असल्याचं सांगत'', महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष आदित्य दुरुगकर यांनी एमसी स्टॅनच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. शिवाय एमसी स्टॅनला नागपपुरात कोणताच शो करु देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

'बिग बॉस'चा शो संपल्यानंतरसुद्धा एमसी स्टॅन सतत चर्चेत राहात आहे. दरम्यान घरातून बाहेर येताच एमसी स्टॅनने 'इंडिया टूर' सुरु केलं आहे. आपल्या या टूरअंतर्गत तो देशातील विविध शहरांमध्ये जाऊन आपले रॅप शो आयोजित करत आहे.

(हे वाचा:Oscars 2023: 'ऑस्कर तर दिला पण...', ऑस्करच्या मंचावर घडलेल्या 'त्या' प्रकाराने भारतीय निर्माती दुःखी )

दरम्यान आज 18मार्चला एमसी स्टॅन नागपुरात शो करणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एमसी स्टॅनच्या या कार्यक्रमावर आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे हा शो रद्द होणार का? असा प्रश्न एमसी स्टॅनच्या चाहत्यांना पडला आहे.

एमसी स्टॅन बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यापासून तो प्रचंड चर्चेत आला आहे. या शोमध्ये त्याने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. या शोच्या शेवटी प्रियांका चहर चौधरी, शिव ठाकरेला मागे टाकत बिग बॉसची ट्रॉफी जिंकत त्याने सर्वांनाच चकित केलं होतं. अनेकांनी या गोष्टीला विरोधही केला होता. परंतु त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता.

First published:

Tags: Bigg Boss 16, Entertainment, Nagpur