मुंबई, 16 मार्च- गेल्या अनेक दिवसांपासून ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता लागून होती. अखेर हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाचा ऑस्कर सोहळा प्रत्येक भारतीयांसाठी प्रचंड खास होता. यावेळी भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. लघुपटाच्या यादीत 'द एलिफंट व्हिस्पर्स' या लघुपटाला ऑस्कर मिळाला आहे. तर दुसरा सर्वांनाच प्रचंड उत्सुकता असलेल्या एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉंगच्या कॅटगरीमधील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
ऑस्कर 2023 चे निर्माते राज कपूर यांनी खुलासा करत रामचरण आणि ज्यु. एनटीआरने ऑस्करमध्ये परफॉर्मन्स का दिलं नाही याचा खुलासा केला आहे. राज कपूर यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, 'गायक राहुल सिप्लिगुंज आणि काल भैरव यांच्यासोबत मुख्य कलाकार असणाऱ्या ज्यु. एनटीआर आणि रामचरण यांना परफॉर्मन्स करायचा होता. अमेरिकेतील त्यांच्या परफॉर्मन्ससाठी व्हिसासारख्या सर्व कायदेशीर गोष्टींची मदतही करण्यात आली होती.
(हे वाचा: Daljiet Kaur Wedding: शालिन भनौतच्या एक्स-पत्नीची लगीनघाई; प्री-वेडिंग कार्यक्रमांना झाली सुरुवात)
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटाला या दोन्ही कलाकारांना याबाबत सूचनाही देण्यात आली होती. मात्र लाईव्ह परफॉर्मन्स करण्यात ते दोघे कंफर्टेबल नव्हते. त्यांच्याजवळ इतर व्यावसायिक कामे होती. त्यामुळे त्यांना प्रॅक्टिस करण्यास पुरेसा वेळही नव्हता. आणि त्यामुळेच या दोघांना लाईव्ह परफॉर्मन्स करणं योग्य वाटतं नव्हतं म्हणून त्यांनी या गोष्टीला नकार दिला असल्याचं उघड झालं आहे.
'नाटू नाटू' या मूळ गाण्याची रिहर्सल आणि वर्कशॉप तब्बल दोन घेण्यात आली होती. आणि त्यांनतर 15 दिवसांच्या कालावधीत हे गाणं शूट करण्यात आलं होत. त्यामुळे लाईव्ह परफॉर्मन्ससाठीही पुरेसा वेळ हवा होता. ऑस्करमध्ये सादर झालेलं हे गाणं 15 दिवसांच्या कालावधीत रिहर्सल करण्यात आलं होतं.
दरम्यान हा ऑस्कर सोहळा सर्वच बाजूनी भारतीयांसाठी खास ठरला. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात पुरस्कार सादरीकरणासाठी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणला बोलवण्यात आलं होतं. दीपिका पादुकोण ही चौथी अभिनेत्री होती जिने ऑस्करमध्ये पुरस्कार सादर केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Oscar 2023, Oscar award show, South indian actor