Home /News /entertainment /

'चल निघ!' भर रस्त्यात रणबीर कपूरवर भडकली होती प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री; पाहा काय घडलं होतं

'चल निघ!' भर रस्त्यात रणबीर कपूरवर भडकली होती प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री; पाहा काय घडलं होतं

एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीने रणबीरला (Ranbir Kapoor) चक्क हकललं होतं. तसेच त्याना चल इथून निघ असंही ती म्हणाली होती. रणबीरने स्वतःच या गोष्टीचा खुलासा देखील केला होता.

  मुंबई 14 ऑगस्ट : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) खूप आधीच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. सध्या तो लागोपाठ चित्रपटांत दिसत नसला तरीही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. पण रणबीरच्या बाबतीत एकदा अशी गोष्ट घडली होती जी ऐकून त्याच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीने रणबीरला चक्क हकललं होतं. तसेच त्याना चल इथून निघ असंही ती म्हणाली होती. रणबीरने स्वतःच या गोष्टीचा खुलासा देखील केला होता. दरम्यान घडलं असं की, हॉलिवूची प्रसिद्ध अभिनेत्री नैतली पोर्टमनचा (Natalie Portman) रणबीर मोठा फॅन आहे. त्याने सांगितलं की, “मी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरून धावत होतो तर हॉटेलकडे जात होतो. तेव्हाच माझ्या बाजूने नैतली पोर्टमन गेली आणि माझी तिच्या नजरेला नजर मिळाली.” पुढे रणबीर म्हणाला की, “मी यु टर्न घेतला आणि तिचा पाठलाग करू लागलो आणि एक फोटो प्लीझ, एक फोटो प्लीझ म्हणत होतो. पण प्रत्यक्षात माझं लक्ष नव्हतं की फोनवर बोलत होती आणि रडत होती. अशातच तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली निघ इथून (Get Lost from here)”

  लंडनमध्ये निक - प्रियंकाची रोमॅन्टीक डेट; एकमेकांसोबत असा वेळ घालवतय पॉवर कपल

  दरम्यान रणबीरने अजूनही आपण तिचे चाहते आहोत असं म्हटलं आहे. यानंतर रणबीरचं मन फार तुटलं होतं. मात्र तरीही आपण पुन्हा कधी ती भेटली तर तिच्याकडे फोटो मागू असंही तो म्हणाला. द कपिल शर्मा शोमध्ये रणबीरने या गोष्टीचा खुलासा केला होता. याआधीही काही हॉलिवूड अभिनेत्यांनी रणबीरला ओळखलं नव्हतं.

  वो हसीना..! नोरा फेतेहीने पुन्हा केलं चाहत्यांना घायाळ; ग्लॅमरस लुक पाहून चाहते 'Speechless'

  रणबीर त्याच्या चित्रपटांइतकाच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहतो. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीरचं नात नेहमीच चर्चेता विषय ठरलं आहे. याशिवाय या दोघांचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Ranbir, Ranbir kapoor, Ranbir kapur

  पुढील बातम्या