VIDEO :...कभी डरते नही! रानू मंडल यांनी लतादीदींच्या सल्ल्यानंतरही गायलं त्याचं गाजलेलं गाणं

VIDEO :...कभी डरते नही! रानू मंडल यांनी लतादीदींच्या सल्ल्यानंतरही गायलं त्याचं गाजलेलं गाणं

'तेरी मेरी कहानी' हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. त्यानंतर सध्या सोशल मीडियावर रानू यांचा एक नवा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या सिंगर रानू मंडल यांचं पहिलं गाणं नुकतंच रिलीज झालं. रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियानं तिला त्याच्या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली होती. मागच्या काही दिवसांपासून हिमेशच्या स्टुडिओमधील रानू यांचा 'तेरी मेरी काहानी' या गाण्याचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्वांनाच रानू यांच्या पहिल्या गाण्याच्या रिलीजची उत्सुकता होती. 'तेरी मेरी कहानी' हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. त्यानंतर आता त्यांचं आणखी एक 'आदत' नवं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर रानू यांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

रानू मंडल यांचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये रानू लता दीदींचं 'प्यार करनेवाले डरते नहीं' हे गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या तेरी मेरी कहानीच्या रिलीज इव्हेंटमधला असल्याचं लक्षात येतं. या व्हिडीओमधून आपल्या मधुर आवाजानं रानू यांनी पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.

 

Loading...

View this post on Instagram

 

#ranumandal sings her favourite #latamangeshkar track @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

एक प्यार का नगमा है’ गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी

रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतींद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे. एक दिवस त्यानं रानू यांचं प्यार का नगमा व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर अकाउटवर अपलोड केला. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या कंटेंटच्या शोधात असणाऱ्या अनेक पेज पैकी एक पेज ‘बरपेटा टाउन द प्लेस ऑफ पीस’ला यतींद्रचा हा व्हिडीओ सापडला. त्यानी ते त्यांच्या पेजवर शेअर केला. अशा रितीनं हा व्हिडीओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. त्यानंतर अनेक वेब पोर्टल्सनी त्याची बातमी केली आणि रानूच्या आवाजाची तुलना लता मंगेशकर यांच्यांशी केली जाऊ लागली.

'सुपरस्टार सिंगर'च्या स्पर्धकांनाही रानू मंडल यांच्या आवाजाची भुरळ, पाहा VIDEO

रानू यांचे  व्हिडीओ सतत शेअर होत असल्यानं सोशल मीडिया पेज चालवणाऱ्या अनेकांनी एतींद्र पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे रानूच्या गाण्याला रिअलिटी शोमध्ये संधी मिळावी. याशिवाय रिअलिटी शो मेकर्स सुद्धा त्यांच्या टीआरपीसाठी असा प्रकारच्या गोष्टी शोधत असतात आणि योगायोगानं दोन्ही गोष्टी जुळून आल्या बॉलिवूडमध्ये हिट गाणी दिलेल्या हिमेश रेशमियानं रानू यांना पहिला ब्रेक दिला आणि त्यांचं आयुष्य बदललं.

VIDEO : अनुष्का शर्माला लागलीय विचित्र सवय, शूटिंग सुरू असताना करते 'हे' काम

रानू मंडल मूळ पश्चिम बंगालच्या राहणाऱ्या आहेत. त्यांचं वय 60 वर्ष असून काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं आहे. त्यांना एक मुलगी आहे. तिनं काही दिवस रानू यांची काळजी घेतली मात्र मागच्या 10 वर्षांपासून तिनं आपल्या आईशी नातं तोडलं. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनच्या बाजूला रानू यांचं घर आहे. मात्र तिथे तिचं सर्व सामन अस्ताव्यस्त पडलेलं असतं. या घराच्या भिंती कोसळत आहेत. अशा पडझड झालेल्या या घरात रानू एकट्या राहतात.

लता मंगेशकरांच्या गाणं बासरीवर वाजवणाऱ्या पुण्याच्या या मुलीचा VIDEO VIRAL

सामान्यतः रानू बंगाली बोलतात. मात्र त्या हिंदी सुद्धा बोलू शकतात. त्या जेव्हा 7-8 वर्षांच्या होत्या तेव्हा पासून त्या गात आहेत. रेडिओ आणि टेप वरील रेकॉर्डर ऐकून त्या गाणं शिकल्या आणि मग संधी मिळाल्यावर त्या स्टेजवर गाऊ लागल्या. सुरुवातीला रानू यांनी रेल्वे स्टेशनवर गायला सुरुवात केली होते. त्यावेळी त्यांना गाण्याच्या बदल्यात काही ना काही मिळू लागलं तसं त्यांनी लता मंगेशकर यांची गाणी हूबेहुब त्यांच्या सारखंच गाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्यांना समजलं की गाण्यामुळे त्यांच्या पोटापाण्याचा खर्च सुटतो आहे. त्यानंतर त्यांनी आणखी चांगलं गाण्याचा प्रयत्न करु लागल्या.

===========================================================

बापरे! गाणं गाता गाताच गेला त्यांचा जीव, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 11:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...