VIDEO : अनुष्का शर्माला लागलीय विचित्र सवय, शूटिंग सुरू असताना करते 'हे' काम

नुकत्याच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे अनुष्का शर्मा खूप चर्चेत आली आहे. या व्हिडीओमुळेच तिला लागलेल्या या विचित्र सवयीचा खुलासा झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 18, 2019 05:28 PM IST

VIDEO : अनुष्का शर्माला लागलीय विचित्र सवय, शूटिंग सुरू असताना करते 'हे' काम

मुंबई, 18 सप्टेंबर : अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरीही सोशल मीडियावर मात्र ती सक्रिय असते. मागच्या काही दिवसांपासून ती पती विराट कोहलीसोबत व्हेकेशन एंजॉय करत आहे. याचे अनेक फोटोसुद्धा तिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. मात्र कामाच्या दरम्यान अनुष्काला एक विचित्र सवय लागली आहे. याबाबत नुकत्याच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती सगळीकडे चर्चेत आली आहे.

अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तिनं तिला लागलेल्या या विचित्र सवयीबद्दल सांगितलं तर आहे मात्र तिला ही सवय लागली आहे हे मान्य मात्र केलेलं नाही. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती काम करताना जांभई देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अनुष्कानं, मी काम करताना कधीच जांभई देत नाही असं म्हटलं आहे. मात्र या व्हिडीओमध्ये ती वारंवार जांभई देताना दिसत आहे आणि यातली गंमतीशीर गोष्ट अशी की, या व्हिडीओमध्ये बॅकग्राउंड म्युझिक म्हणून वेस्टर्न म्युझिक वापरण्यात आलं आहे.

लता मंगेशकरांच्या गाणं बासरीवर वाजवणाऱ्या पुण्याच्या या मुलीचा VIDEO VIRAL

Loading...

 

View this post on Instagram

 

No ! I wasn't yawning at work . Obviously not

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

या व्हिडीओमध्ये अनुष्का थोड्या वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. तिनं ऑरेंज कलरचा ड्रेस घातला असून बॉबकट हेअर स्टाइल तिनं केली आहे. अनुष्काच्या या व्हिडीओवर युजर्सच्या अनेक विनोदी प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. याशिवाय यावर अभिनेता वरुण धवन आणि झरीन खान यांनी सुद्धा कमेंट केल्या आहे.

Made In China चा ट्रेलर रिलीज, पोट सुटलेल्या अवस्थेत दिसला राजकुमार राव

अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर झिरो सिनेमात तिने शेवटचं काम केलं होतं. यानंतर तिने नवीन कोणताच प्रोजेक्ट स्वीकारला नाही. मात्र ती लवकरच नेटफ्लिक्सच्या एका वेब सीरिजसाठी काम करणार आहे. अनुष्का आणि कर्नेश शर्मा यांची क्लिन स्लेट फिल्म Mai या सीरिज साठी एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहे. हा अनुष्काचा नेटफ्लिक्ससोबतचा एकत्र दुसरा प्रोडेक्ट आहे. याआधी क्लिन स्लेटनं याआधी बुलबुल ही एक वेबसीरिज प्रोड्यूस केली होती.

अगं बाई अरेच्चा! 'ही' तर 'कतरिना कैफ'ची कार्बन कॉपीच, सलमान खानदेखील फसेल

=============================================================

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...