मुंबई, 18 सप्टेंबर : प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमिया मागच्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. पश्चिम बंगालची सोशल मीडिया सेन्सेशन सिंगर रानू मंडल यांना आपल्या सिनेमासाठी गाण्याची संधी देणऱ्या हिमेशचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हिमेशनं रानू मंडल यांना 1-2 नाही तर तब्बल 3 गाणी गाण्याची संधी दिली. रानू आणि हिमेश यांची सुपरस्टार सिंगरच्या मंचावर झाली होती आणि याच ठिकाणी त्यानं रानू यांना त्याच्या सिनेमासाठी गाण्याची संधी देऊ केली. रानू यांच्या आवाजातलं तेरी मेरी हे गाणं नुकतंच रिलीज झालं आणि त्याला सर्वांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सध्या सोशल मीडियावर हिमेशच्या हॅप्पी हार्डी अँड हिर या सिनेमाची चर्चा आहे. अशातच हिमेशनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ज्यामध्ये सुपरस्टारच्या मंचावर हिमेश आपल्या गाण्यासाठी चिअरअप करताना दिसत आहे. सुपरस्टार सिंगरच्या मंचावर एका स्पर्धकानं रानू मंडल यांनी गायलेल्या ‘तेरी मेरी कहानी’ या गाण्यावर परफॉर्म केलं. हा व्हिडीओ शेअर करत हिमेशनं लिहिलं, अंकोनानं ‘तेरी मेरी कहानी’वर खूप छान परफॉर्म केलं हे गाणं माझ्यासाठी खूपच स्पेशल. सुपरस्टार सिंगरच्या संपूर्ण टीमनं दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. Made In China चा ट्रेलर रिलीज, पोट सुटलेल्या अवस्थेत दिसला राजकुमार राव
रानू काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनजवळ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचं गाणं ‘एक प्यार का नगमा हैं’ गाताना दिसली होती. एका व्यक्तीनं तिचा गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि रानू रातोरात स्टार झाली. या एका व्हिडीओनं तिचं अवघं आयुष्यच बदलून टाकलं. याबाबत बोलताना रानू सांगते, हा माझा दुसरा जन्म आहे आणि मी त्याला अधिकाधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन. अगं बाई अरेच्चा! ‘ही’ तर ‘कतरिना कैफ’ची कार्बन कॉपीच, सलमान खानदेखील फसेल रानू मंडल यांचं ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज झालं. त्यानंतर आता त्यांचं आणखी एक ‘आदत’ नवं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी हिमेशनं या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक व्हिडीओ सोशल शेअर केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या गाण्याचा म्यूझिक ट्रॅक हिमेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
रानू यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना हिमेशनं लिहिलं, रानू मंडल यांचा आवाज खूपच गोड आहे. ‘आदत’च्या रेकॉर्ड दरम्यान मला ही गोष्ट जाणवली की, रानू या वन साँग वंडर नाहीत. जेव्हा तुम्ही आदत ऐकाल तेव्हा ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. त्यांचा आवाज खरंच शानदार आहे. ‘आरे मेट्रो’ समर्थनार्थ ट्वीट करून बिग बी फसले, जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शनं ‘आदत’नंतर रानू मंडल हिमेशसोबत ‘आशिकी में तेरी…’ साठी सुद्धा काम करणार आहे. याआधी रिलीज झालेलं त्यांंचं डेब्यू साँग ‘तेरी मेरी कहानी’ खूप हिट झालं. रेल्वे स्टेशनवर गाणाऱ्या रानूचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हिमेश रेशमियानं तिला त्याच्या सिनेमासाठी गाण्याची संधी दिली होती. ========================================================= अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO