मुंबई, 06 ऑक्टोबर : बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांची आज 74 वी जयंती आहे. बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्यांपैकी असलेल्या विनोद खन्ना यांचा 27 एप्रिल 2017 रोजी मृत्यू झाला. आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना विविध पुरस्कारांनीदेखील गौरवण्यात आलं होतं. बॉलिवूडबरोबरच ते राजकारणातदेखील सक्रीय होते. पंजाबमधील गुरुदासपूर येथून ते भाजपचे खासदार होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण काही चित्रपटांवर नजर टाकणार आहोत.
1) अमरअकबरअँथनी
1977 मध्ये आलेला हा बॉलिवूडमधील एक सुपरहिट सिनेमा आहे. विनोद खन्ना यांच्याबरोबरच या सिनेमात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनीदेखील प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. लहानपणी परिस्थितीमुळे परस्परांपासून दूर झालेल्या तीन भावांची ही कथा होती. हे तिन्ही भाऊ वेगवेगळ्या धर्मांच्या समाजात मोठे होतात अशी कथा होती. या सिनेमात विनोद खन्ना यांनी एका कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर अमरची भूमिका साकारली होती. कादर खान लिखित हा सिनेमा मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केला होता.
(हे वाचा-'बिहार मैं आपका स्वागत है...', Most Awaited 'मिर्झापूर-2'चा ट्रेलर लाँच)2) हेराफेरी
या सिनेमात विनोद खन्ना यांच्याबरोबर महानायक अमिताभ बच्चन यांनी भूमिका साकारली होती. 1976 मध्ये आलेल्या या सिनेमात सायरा बानो यांनी देखील काम केलं होतं. यात दोन कलाकार मित्रांची कथा होती. या सिनेमाचे टायटल सॉंग मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालं होतं. किशोर कुमार आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातील या गाण्याने धुमाकूळ घातला होता.
3) परवरिश
मनमोहन देसाई दिग्दर्शित हा सिनेमा 1977 मध्ये आला होता. शम्मी कपूर, अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. परिस्थितीमुळे दोन भावांमध्ये आलेल्या शत्रूत्वाची ही कथा आहे. त्याचबरोबर शबाना आझमी आणि नितू कपूर यांनीदेखील यामध्ये काम केलं होतं. या सिनेमातील आशा भोसले यांच्या आवाजातील 'जाते हो जाने जाना' हे गाणं अजूनही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे
(हे वाचा-रोहित शर्मा आहे या बॉलिवूड अभिनेत्रीचा 'क्रश', मुंबईतील उद्योपतीशी करणार लग्न)4) खूनपसीना
1977 मधील राकेश कुमार दिग्दर्शित या सिनेमात विनोद खन्ना यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. पहिल्यांदा परस्परांविरुद्ध लढणाऱ्या दोन तरुणांची ही कथा. हे दोघं नंतर एकत्रितपणे मोठ्या शत्रूचा सामना करतात असं कथानक होतं. रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.