Home /News /entertainment /

रोहित शर्मा आहे या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा 'क्रश', मुंबईतील उद्योपतीशी करणार लग्न

रोहित शर्मा आहे या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा 'क्रश', मुंबईतील उद्योपतीशी करणार लग्न

दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Agrawal) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. स्वत: काजलने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

    मुंबई, 06 ऑक्टोबर : दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Agrawal) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. स्वत: काजलने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. काजल गौतम किचलू (Gautam Kitchlu) या उद्योगपतीशी लग्नगाठ बांधणार आहे. हिंदी, तमिळ आणि तेलूगू चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली काजल लग्न करतेय म्हटल्यावर तिच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 30 ऑक्टोबर रोजी एका खाजगी छोटेखानी कार्यक्रमात गौतम आणि काजल लग्नगाठ बांधणार आहेत. 'I Said Yes' असं हेडिंग देत काजलने एक नोट शेअर केली आहे. यामध्ये तिने म्हटले आहे की, ' मला हे शेअर करताना अत्यंत आनंद होत आहे की, 30 ऑक्टोबर 2020 रोजी मी गौतम किचलू यांच्याशी एका छोटेखानी, खाजगी कार्यक्रमात आमचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रपरिवारांच्या साक्षीने विवाह करणार आहे. ' काजलने असे म्हटले आहे की पँडेमिकनंतर एका मोठ्या उत्साहात पुन्हा एकदा नवीन आयुष्य सुरू करण्यात तिला खूप आनंद होत आहे. त्याचप्रमाणे चाहत्यांनी तिच्यावर दाखवलेल्या प्रेमासाठी काजलने त्यांचे आभार मानले आहेत. तिने या नोटच्या शेवटी म्हटले आहे की, 'यानंतरही मी प्रेक्षकांचे मनोरंजन करणे सुरू ठेवणार आहे- आता एका नवीन ध्येयाने आणि अर्थाने. तुमच्या सहकार्यासाठी धन्यवाद'. हिटमॅन रोहित शर्मा आहे काजलचा 'क्रश' क्रिकेट आणि बॉलिवूड हे नातं वर्षानुवर्षे आहे. एका मीडिया अहवालानुसार काजल अग्रवालला क्रिकेटर रोहित शर्मा खूप आवडतो आणि तो तिचा क्रश देखील आहे, ती त्याची खूप मोठी फॅन आहे. एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत माहिती दिली होती. ती त्याची कोणतीही मॅच मिस करत नसल्याचेही तिने म्हटले होते. क्रिकेटप्रमाणेची ती रोहितची मोठी फॅन असल्याचे काजल अग्रवालने यावेळी सांगितले होते. (हे वाचा-15 ऑक्टोबरपासून उघडणार सिनेमागृहं, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी) काजल अग्रवाल विवाहबंधनात अडकणार याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या  लॉकडाऊननंतर पार पडणारं हे पहिल सेलिब्रिटी वेडिंग असेल. गौतम एक बिझनेसमन, इंटिरियर डिझायनर आहे. या लग्नामध्ये केवळ कुटुंबातील सदस्यांना निमंत्रण असेल, अशी देखील माहिती समोर येते आहे. (हे वाचा-सोनू सूद काहीही करू शकतो! ऑनलाइन शिक्षणासाठी गावात थेट बसवला टॉवर) काजलने 'क्यों हो गया ना' या सिनेमातून 2004 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ऐश्वर्या राय-बच्चन आणि विवेक ऑबेरॉय स्टारर या सिनेमात तिने ऐश्वर्याच्या बहिणीची भूमिका केली होती. त्यानंतर तिने दाक्षिणात्य सिनेमांकडे आपला मोर्चा वळवला.  दक्षिणेत काजलची मोठी फॅन फॉलोइंग आहे. 2011मध्ये 'सिंघम' मुळे ती पुन्हा एकदा हिंदी सिनेमात प्रकाशझोतात आली. काजल आता 'मुंबई सागा' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood, Rohit sharma

    पुढील बातम्या