मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'बिहार मैं आपका स्वागत है...', Most Awaited 'मिर्झापूर-2'चा धमाकेदार ट्रेलर लाँच

'बिहार मैं आपका स्वागत है...', Most Awaited 'मिर्झापूर-2'चा धमाकेदार ट्रेलर लाँच

मिर्झापूर-2 चा धमाकेदार ट्रेलर मंगळवार 06 ऑक्टोबर 2020 रोजी 1 वाजता प्रदर्शित झाला आहे.

मिर्झापूर-2 चा धमाकेदार ट्रेलर मंगळवार 06 ऑक्टोबर 2020 रोजी 1 वाजता प्रदर्शित झाला आहे.

मिर्झापूर-2 चा धमाकेदार ट्रेलर मंगळवार 06 ऑक्टोबर 2020 रोजी 1 वाजता प्रदर्शित झाला आहे.

मुंबई, 06 ऑक्टोबर : गुड्डू, बबलू, स्विटी, मुन्ना, गोलू, कालिन भैया अशी एकापेक्षा एक विचित्र नावं असणारी पण कित्येक पटींनी रंजक कथानक असणारी वेब सीरिज 'मिर्झापूर' याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. Mirzapur-2 याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 2018 मध्ये आलेल्या या सीरिजच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवले होते. तुम्ही वेब सीरिज पाहणाऱ्यांपैकी आहात आणि तुम्ही ही सीरिज पाहिली नाही आहे, असं क्वचितच आढळून येईल. पण या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांना खूप वाट पाहायला लावली. 'Most Awaited' हा शब्द अक्षरश: याच सीरिजसाठी बनला आहे की काय, अशी प्रेक्षकांची खात्रीच झाली होती. अखेर 'मिर्झापूर-2' 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर-2 प्रदर्शित होणार आहे.

मिर्झापूर-2 चा धमाकेदार ट्रेलर मंगळवार 06 ऑक्टोबर 2020 रोजी 1 वाजता प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर ट्रेलर येण्याच्या आधीपासूनच याबाबत चर्चा सुरू झाली होती. प्रेक्षकांना यावेळी काय ट्विस्ट अँड टर्न असणार याबाबत उत्सुकता होती आणि हा ट्रेलर पाहून तर ही उत्सुकता आणखी वाढली आहे.

(हे वाचा-रोहित शर्मा आहे या बॉलिवूड अभिनेत्रीचा 'क्रश', मुंबईतील उद्योपतीशी करणार लग्न)

'कालीन भैया' यांचा परफॉर्मन्स पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सूक आहेत, गोलू-गुड्डू काय बदला घेणार यासाठी प्रेक्षक उत्सूक आहेत, 'बिहार मैं आपका स्वागत है...' या डायलॉगचा अर्थ नेमका काय आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सूक आहेत. प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षाही हा ट्रेलर कमाल असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येक कॅरेक्टरच्या बदललेल्या छटा या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या मुन्ना आणि गुड्डूची बहिण डिंपी यांच्यामधील इंटिमेट सीनमुळे तर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रति शंकर शुक्लाचा मुलगा देखील बदला घेण्यासाठी मिर्झापूरमध्ये दाखल होणार आहे. बिना त्रिपाठी अर्थात रसिका दुग्गल देखील यामध्ये काहीतरी मोठी योजना आखताना दिसत आहे. थोडक्यात ही सीरिज पाहण्यासाठी प्रत्येकाची विविध कारणं असणार आहेत. सोशल मीडियावर ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

" isDesktop="true" id="485252" >

या ट्रेलरमध्ये पहिल्या सीझन व्यतिरिक्त आणखी काही नवीन कलाकार देखील दिसत आहेत. पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदू शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, कुलभुषण खरबंदा, श्वेता त्रिपाठी, शिबा चढ्ढा अशी तगडी स्टार कास्ट असणार आहे.

(हे वाचा-15 ऑक्टोबरपासून उघडणार सिनेमागृहं, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी)

या सीझनमध्ये विजय वर्मा, प्रियांशू पैनयूली, इशा तलवार आणि Lilliput यांची एंट्री झाली आहे. आधीच तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या सिनेमात आणखी कसलेले नट आल्याने मिर्झापूरच्या फॅन्समध्ये वाढ होणार हे निश्चित आहे.

First published:

Tags: Web series