• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्राची बॉलिवूड एंट्री? 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाने घेतली भेट

ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्राची बॉलिवूड एंट्री? 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाने घेतली भेट

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील नीरज सह सगळ्याच खेळाडूंची भेट घेतली. या खेरीज बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्यानेही नीरजला भेट दिली.

 • Share this:
  मुंबई 19 ऑगस्ट :  टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत भारताच नाव उंचावणारा खेळाडू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) सध्या फारच चर्चेत आहे. अनेक ठिकाणी त्याचे सत्कार समारंभ पार पाडताना दिसत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील नीरज सह सगळ्याच खेळाडूंची भेट घेतली. बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांनी देखील नीरज चोप्रा आणि मीराबाई चानू यांची भेट घेतली. त्यानंतर त्या दोघांच्या आयुष्यावर बायोपिक येणार असल्याच्या चर्चा रंगल्या. याशिवाय नीरज बॉलिवूडमध्ये जाणार का हे असे ही प्रश्न अनेकांना पडले. दिल्लीत भंडारकर आणि नीरज यांची भेट घडली होती. त्यावेळी त्यांनी एकमेकांशी संवादही साधला. याचं दरम्यान त्यांनी ई टाइम्सला एक मुलाखत दिली त्यात त्यांनी नीरजशी झालेल्या चर्चेवर ही भाष्य केलं.
  भांडारकर म्हणाले, “स्वातंत्र्यदिना निमित्त मी दिल्लीला होतो. मी टोकियो ऑलिम्पिकमधील स्पर्धकांना त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यासाठी भेटलो होतो.” पुढे त्यांनी सांगितलं की, “मी नीरजला म्हणालो तू सुपरस्टार झाला आहेस आणि देशभरात तुझे लाखो चाहते आहेत. मिश्किल अंदाजात पुढे मी विचारलं की नीरज तू गूड लूकींग आहे. त्यामुळे चित्रपटाच काम करण्याचा काही विचार केला आहे का?”

  नऊवारी साडी अन् नाकात नथ... आर्या ठरतेय चाहत्यांची Crush! या लुकमुळे आणखी खुललं गायिकेचं सौंदर्य

  गोल्डन बॉय नीरजने ही यावर हटके उत्तर दिलं, नीरज म्हणाला, “मला अभिनय करण्याची इच्छा नाही. मला माझ्या खेळावर लक्ष केंद्रीत करायचे आहे.” नीरजचे पुढे काही प्लॅन्स असल्याच मधुर भंडारकर यांनी सांगितल. दरम्यान सोशल मीडियावर ही नीरज ची मोठी फॅन फॉलोईंग तयार झाली आहे. इतकचं नाही अनेकांनी साठी तो एक प्रेरणा स्त्रोत बनला आहे.
  Published by:News Digital
  First published: