मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Friendship Day चं औचित्य साधत परीनं मित्रासोबतचा खास VIDEO केला शेअर

Friendship Day चं औचित्य साधत परीनं मित्रासोबतचा खास VIDEO केला शेअर

 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) फेम 'परी' अर्थातच मायरा वैकुळ हिनं 'फ्रेंडशिप डे' निमित्तानं तिच्या मालिकेतील क्युट फ्रेंडसोबत खास व्हिडीओ शेअर केला आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) फेम 'परी' अर्थातच मायरा वैकुळ हिनं 'फ्रेंडशिप डे' निमित्तानं तिच्या मालिकेतील क्युट फ्रेंडसोबत खास व्हिडीओ शेअर केला आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) फेम 'परी' अर्थातच मायरा वैकुळ हिनं 'फ्रेंडशिप डे' निमित्तानं तिच्या मालिकेतील क्युट फ्रेंडसोबत खास व्हिडीओ शेअर केला आहे.

मुंबई, 7 ऑगस्ट : ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा 'फ्रेंडशिप डे' (Friendship Day 2022) अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. ऑगस्ट महिन्यातला हा रविवार मित्र-मैत्रिणींसाठी खूप खास असतो. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त आणखी एक कुटुंब म्हणजे आपले मित्र-मैत्रिणी असतात. आपल्या आयुष्यात त्यांच्यासाठी किती खास जागा आहे आणि ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सांगण्यासाठी हा दिवस मानला जातो. अशातच 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) फेम 'परी' अर्थातच मायरा वैकुळ हिनं 'फ्रेंडशिप डे' निमित्तानं तिच्या मालिकेतील क्युट फ्रेंडसोबत खास व्हिडीओ शेअर केला आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'फ्रेंडशिप डे' चं औचित्य साधत परीनं तिच्या फ्रेंडसोबत खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं यशसोबत म्हणजेच तिचा फ्रेंड श्रेयश तळपदेसोबत फोटोशूट करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओसोबत तिनं फ्रेंडला 'फ्रेंडशिप डे' च्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय 'आय लव यू फ्रेंड' असंही परीनं लिहिलंय.

पुढच्या भागात 'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये मोठ्या उत्साहात मंगळागौर साजरी केलेली पहायला मिळणार आहे. नेहाचा हा पहिलाच मोठा सण असणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्येही मोठा उत्साह दिसत आहे. अशातच चिमुकल्या परीचा मंगळागौर खेळतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामधील परीचा लुक आणि क्युट डान्स चाहत्यांना तिच्या प्रेमात पाडतोय. परीच्या या पारंपारिक लुकनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा -  Dhanashri Kadgaonkar: वहिनीसाहेबांचा भलताच तोरा; पप्पांच्या ऑस्ट्रेलियामधल्या जमीनीत करतात 'हा' व्यवसाय

दरम्यान, परी म्हणजेच मायरा सध्या अवघ्या 5 वर्षांची आहे. मात्र तिचं फॅन फॉलोविंग भलतंच मोठं आहे. अगदी लहाणग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच तिचे चाहते आहेत. सगळ्यांनाच तिचा बोलका स्वभाव, निरागसता, क्युज अंदाज आवडतो. तिच्या प्रत्येक गोष्टींवर चाहते तिला भरभरुन प्रेम देतात.

First published:
top videos

    Tags: Friendship, Marathi entertainment, Tv serial, Zee marathi serial