मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Dhanashri Kadgaonkar: वहिनीसाहेबांचा भलताच तोरा; पप्पांच्या ऑस्ट्रेलियामधल्या जमीनीत करतात 'हा' व्यवसाय

Dhanashri Kadgaonkar: वहिनीसाहेबांचा भलताच तोरा; पप्पांच्या ऑस्ट्रेलियामधल्या जमीनीत करतात 'हा' व्यवसाय

वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकरचा नवा व्हिडिओ तुफान गाजत असून वहिनीसाहेबांचा नवा कारनामा प्रसिद्ध होत आहे.

वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकरचा नवा व्हिडिओ तुफान गाजत असून वहिनीसाहेबांचा नवा कारनामा प्रसिद्ध होत आहे.

वहिनीसाहेब अर्थात अभिनेत्री धनश्री काडगावकरचा नवा व्हिडिओ तुफान गाजत असून वहिनीसाहेबांचा नवा कारनामा प्रसिद्ध होत आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 07 ऑगस्ट: झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला मालिकेत अभिनेत्री धनश्री काडगावकरने वहिनीसाहेब हे पात्र साकारलं होतं. तिचं हे पात्र, त्याचे डायलॉग आणि वहिनीसाहेबांची स्टाईल एवढी गाजली की तिला आजही या पात्राच्या नावानेच ओळखतात. डोक्यात फॉल्ट हाय का? हा खास डायलॉग म्हणणाऱ्या वहिनीसाहेब आज चक्क त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल बोलताना दिसत आहे. (vahinisaheb dhanashri kadgaonkar) धनश्रीचा एक नवा विडिओ सध्या चर्चेचा विषय बनत आहे. धनश्री या व्हिडिओमध्ये वहिनीसाहेबांच्या अंदाजात असं म्हणते, “हे तर काहीच नाही, तू म्हणलंस ना आत्ता ऑस्ट्रेलिया… त्या ऑस्ट्रेलियामध्ये आमच्या पप्पांची पन्नास एकर जमीन आहे. आणि त्या पन्नास एकर जमिनीत कांगारूंचं कुकुटपालन पण होतंय.” असं धनश्री म्हणताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये वहिनीसाहेब कांगारूंचं कुकुटपालन करतात हे ऐकून चाहत्यांना हसू रोखणं अगदी कठीण होत असल्याचं मिळणाऱ्या प्रतिसादावरून दिसत आहे. तर हा डायलॉग मालिकेत घेतलेला नसून हवा येऊ द्या कार्यक्रमात म्हणालेला हा डायलॉग बराच viral झाला आणि त्यावर अनेक रील्स सुद्धा बनवली. तोच ऑडिओ वापरत ओरिजिनल वहिनीसाहेब सध्या त्यांच्या खास अंदाजात धमाल उडवताना दिसत आहेत. हे ही वाचा- Big Boss Marathi 4: 'हे' आघाडीचे कलाकार असणार बिग बॉस मराठीचा भाग? अनेक नावांची होतेय चर्चा याबद्दल धनश्री कॅप्शन लिहीत म्हणते, “चला म्हणलं आपल्या या डायलॉग वर अनेक जण रील करत आहेत , तर आपण पण करून बघावं ...खरं तर हा सिरीयल मधला डायलॉग नाही , चला हवा येऊ द्या ला घेतलेला हा डायलॉग इतका viral आणि फेमस होईल असं कधीच वाटलं नव्हतं ... पण आज पण हे रील गाजतंय , अनेक मुली या वर रील करून मला टॅग करतात , पाठवतात , खूप मस्त वाटतं ..तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद ..आता एक नवीन सिरीयल येतेय.. @tuchalpudha_official तिथे ही असच प्रेम द्या .. ❤️❤️❤️❤️”
धनश्री येत्या काळात झीमराठीवर आणखीन एका खलभूमिकेत दिसणार आहे. ‘तू चाल पुढं’ मालिकेत ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून एका गाजलेल्या भूमिकेनंतर तिला पुन्हा बघायला प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. या मालिकेतून दीपा परब ही अभिनेत्री सुद्धा छोट्या पडद्यावर पुरागमन करणार आहे.
First published:

Tags: Funny video, Marathi actress, Zee marathi serial

पुढील बातम्या