मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /नुसरत जहाँ यांनी गुपचूप उरकलं लग्न? बाळाच्या जन्माबाबतही केला मोठा खुलासा

नुसरत जहाँ यांनी गुपचूप उरकलं लग्न? बाळाच्या जन्माबाबतही केला मोठा खुलासा

nusrat jahan and yash dasgupta

nusrat jahan and yash dasgupta

लग्न तुटल्याने आणि मुलाच्या जन्मामुळे बंगाली चित्रपट उद्योगाची अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) या खासगी गोष्टींमुळे सतत चर्चेत असते. दरम्यान, नुसरत जहाँ यांची एक पोस्ट व्हायरल होत असून त्यांनी अभिनेता यश दासगुप्तासोबत(Yash Dasgupta) गुपचूप लग्न उरकले असल्याची चर्चा रंगली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 11 ऑक्टोबर: लग्न तुटल्याने आणि मुलाच्या जन्मामुळे बंगाली चित्रपट उद्योगाची अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ (Nusrat Jahan) या खासगी गोष्टींमुळे सतत चर्चेत असतात. दरम्यान, नुसरत जहाँ यांची एक पोस्ट व्हायरल होत असून त्यांनी अभिनेता यश दासगुप्तासोबत(Yash Dasgupta) गुपचूप लग्न उरकले असल्याची चर्चा रंगली आहे. इतकेच नव्हे तर या दोघांनी एका मुलाखतीवेळी बाळाच्या जन्मबाबतही काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

नुसरत जहाँने काल रात्री यश दासगुप्ताचा वाढदिवस साजरा केला. तिने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्याचे फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंमध्ये या केकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा पती आणि बाबा लिहिलेले आहे. हे पाहिल्यानंतर लोक आता अटकळ बांधत आहेत की, नुसरतने यशशी लग्न केले आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा- अबराम आर्यनचा मुलगा असल्याच्या अफवेने हादरलेलं कुटुंब; शाहरुखचा तो खुलासा चर्चेत

इतकेच नव्हे तर नुसरतने यश दासगुप्तासोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यात दोघे कॅन्डल लाईट डिनर करताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नुसरतने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रेमा.’ म्हटले आहे.

यासोबतच सध्या बाळाच्या जन्माबाबतचा एक किस्सा व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वीच नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या बाळाविषयी आणि एकमेकांच्या नात्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. सोबतच 'लोकं काय म्हणतात याची मला पर्वा नाही', असे नुसरत जहाँ यांनी सांगितले. तसेच,  मला त्यावेळी अजिबात भीती वाटत नव्हती. हा आमचा वैयक्तिक निर्णय होता. लोकं काय बोलतील याची मला पर्वा नव्हती. एक खात्री होती, एक तर लोकं मला स्ट्राँग बोलतील किंवा माझ्यावर टीका करतील", असे नुसरत म्हणाली.

हे वाचा-  'आज तुमचे हे चांगले खेळले'; ऋतुराजच्या खेळीमुळे सायली संजीववर चाहते भलतेच खूश

तर, बाळाला जन्म देण्यामागे आमची काही कारणे असू शकतात. मला एक सांगा जी लोकं आमच्याबद्दल चर्चा करतात त्यांना आमच्याकडून नेमकी कशाची अपेक्षा आहे. मी एका प्रेग्नंट स्त्रीला वाऱ्यावर सोडून देऊ? लोकांच्या नजरेत हे योग्य आहे का ?", असे सवाल उपस्थित करत यशने संताप व्यक्त केला.

26 ऑगस्ट रोजी नुसरत जहाँने मुलाला जन्म दिला. नुसरत जहाँ आता कामावर परतली आहे. लोकांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केली आहे. या आधी मुलाच्या वडिलांच्या नावाबद्दल नुसरत खूप चर्चेत होती. वास्तविक, कोलकाता महानगरपालिकेच्या पोर्टलवर मुलाच्या जन्माच्या नोंदणीचा ​​तपशील उघड झाला. अशा परिस्थितीत, मुलाचे आणि मुलाच्या वडिलांचे नाव समोर आले होते.

उघड झालेल्या माहितीमध्ये मुलाचे नाव यिशान जे दासगुप्ता असे लिहिले आहे. त्याचबरोबर वडिलांचे नाव देबाशिष दासगुप्ता असे लिहिले आहे. अभिनेता यश दासगुप्ताचे अधिकृत नाव देबाशीष दासगुप्ता आहे. यावरून स्पष्ट झाले की, यशदास गुप्ता नुसरत जहाँच्या मुलाचे वडील आहेत.

First published:

Tags: Entertainment, Politices, West bangal