मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अबराम आर्यनचा मुलगा असल्याच्या अफवेने हादरलेलं कुटुंब; शाहरुख खानचा तो खुलासा पुन्हा चर्चेत

अबराम आर्यनचा मुलगा असल्याच्या अफवेने हादरलेलं कुटुंब; शाहरुख खानचा तो खुलासा पुन्हा चर्चेत

अबराम या शाहरुख आणि गौरी खान यांच्या सर्वात लहान मुलाचा पिता त्याचा मोठा भाऊ आर्यन असल्याच्या अफवा इंटरनेटवर उडाल्या होत्या

अबराम या शाहरुख आणि गौरी खान यांच्या सर्वात लहान मुलाचा पिता त्याचा मोठा भाऊ आर्यन असल्याच्या अफवा इंटरनेटवर उडाल्या होत्या

अबराम या शाहरुख आणि गौरी खान यांच्या सर्वात लहान मुलाचा पिता त्याचा मोठा भाऊ आर्यन असल्याच्या अफवा इंटरनेटवर उडाल्या होत्या

  नवी दिल्ली 11 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याचं कुटंब सध्या चर्चेत आहे. शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा सध्या मुंबई ड्रग (Mumbai drug bust) प्रकरणी एनसीबीच्या अटकेत आहे. जेव्हापासून आर्यनला अटक झाली आहे तेव्हापासून शाहरुख खानचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये शाहरुखचा ‘टेड टॉक’मधील एक व्हिडिओ देखील आहे. हा व्हिडिओ 2017 मधील असून त्यात शाहरूख वॅन्कुव्हरमधील टेड टॉक (TED Talk) स्टेजवर बोलताना दिसत आहे. या टॉक दरम्यान, शाहरुखनं आर्यन आणि अबराम (Abram Khan) विषयीच्या अफवांबाबत आपली प्रतिक्रिया दिली होती.

  अबराम या शाहरुख आणि गौरी खान यांच्या सर्वात लहान मुलाचा पिता त्याचा मोठा भाऊ आर्यन असल्याच्या अफवा इंटरनेटवर उडाल्या होत्या. धाकटा असलेला अबराम आणि शाहरुखची मधली मुलगी सुहाना यांच्या वयामध्ये 12 वर्षांचे अंतर आहे. जेव्हा अबरामचा जन्म झाला तेव्हा त्याच्या जन्माबद्दल अनेक अफवा माध्यमांमध्ये आणि इंटरनेटवर चर्चिल्या गेल्या होत्या. अबरामचा जन्म 2013 सालचा आहे.

  लाल लेहंग्यामध्ये मलायका अरोराचा जादुई रँप वॉक, पाहा PHOTOS

  'चार वर्षांपूर्वी माझी पत्नी गौरी (Gauri Khan) आणि मी तिसरं मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला. जेव्हा अबरामचा जन्म झाला तेव्हा इंटरनेटवर असा दावा करण्यात आला की तो आर्यनचा प्रेमसंबंधातून झालेला मुलगा आहे. रोमानियामध्ये एका मुलीसोबत फिरतानाचा आर्यनचा एक फेक व्हिडिओ या अफवेला जोडण्यात आला होता. ही चर्चा आमच्या कानावर आली तेव्हा आर्यन फक्त 15 वर्षांचा होता. या सर्व प्रकरणामुळं आमचं संपूर्ण कुटुंब हादरून गेलं होतं. आता आर्यन 19 वर्षांचा आहे. त्याच्याकडे युरोपियन ड्रायव्हिंग लायसन्स देखील नाही,' असं वॅन्कुव्हरमधील टेड टॉक्समध्ये बोलताना शाहरुख म्हणाला होता. शाहरूखने हे स्पष्ट केलं होतं की इंटरनेटवर काहीही अफवा पसरवल्या जातात. ज्याच्याकडे युरोपात कार चालवण्याचं लायसन्स नाही तो मैत्रिणीला घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ नेटवर टाकण्यात आला होता.

  शाहरुखनं सोशल मीडियाबद्दल बोलताना आपला दृष्टिकोण स्पष्ट केला होता. 'सध्या वास्तविक गोष्टी आभासी बनल्या आहेत आणि आभासी गोष्टी वास्तविक झाल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये, आपण जे बनू इच्छितो किंवा आपण जो विचार करतो, तो आपण उघडपणे मांडू शकत नाही. माझ्या सारख्या व्यक्तीसाठी ही एक मोठी समस्या झाली आहे,' असं मत देखील शाहरूखनं मांडलं होतं.

  ...ते आठवून आजही डोळ्यात पाणी येतं; 'तारक मेहता...'फेम बबीताने शेअर केलेली पोस्ट

  17 मिनिटांच्या भाषणात शाहरुखनं आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींना स्पर्श केला होता. नवी दिल्लीत गेलेलं बालपण, तरुणपणातील दिवस, वयाच्या विसाव्या वर्षी आईवडील गमावल्यानंतर 'मुंबई महानगरा'पर्यंतचा प्रवास त्यानं कसा पार केला, याबद्दल त्यानं सांगितलं होतं. आर्यनच्या तुरुंगवासानंतर आता हे व्हिडिओ पुन्हा वर येत आहेत आणि हेच जुने मुद्दे पुन्हा नेटवर चघळले जात आहेत.

  First published:

  Tags: Aryan khan, Shah Rukh Khan