मुंबई, 12 नोव्हेंबर : आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी ते काहीही करताना पहायला मिळतात. अनेक वेळा आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला भेटल्यावर चाहते खूप इमोशनल होऊन ढसा ढसा रडू लागतात. अशातच असाच एक चाहत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. हा व्हिडीओ दुसरा तिसरा कुणाचा नसून अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचे आणि तिची क्रेझी फॅनचा आहे.
अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीचे लाखो चाहते आहेत. नोराचा डान्स व्हिडीओ असो किंवा ग्लॅमरस फोटोशूट, तिच्या प्रत्येक कृतीवर चाहत्यांचं लक्ष असतं. अभिनयाच्या जगात नोराची जादू चालणार नाही, पण बॉलिवूडचे मोठे चित्रपट नोराच्या खास डान्स नंबरशिवाय अपूर्ण आहेत. नोरा फतेही लाखो हृदयांची धडधड बनली आहे. तिला भेटण्यासाठी चाहते खूप उत्साही असतात. नुकतंचा एक चाहती नोरा भेटली. तिला भेटताच ती ढसा ढसा रडू लागली आणि नोरा घट्ट मिठी मारली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा - जान्हवी कपूरने 'ओम शांती ओम'चा 'तो' आयकॉनिक सीन केला रिक्रिएट, VIDEO व्हायरल
विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकांउंटवर नोरा आणि तिच्या चाहतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, नोराला भेटण्यासाठी एक चाहती झलक दिखला जा 10 च्या सेटबाहेर पोहचली. चाहती तिचं नाव तान्या असल्याचं सांगते त्यानंतर नोरा तिच्या कपाळावर किस करते आणि तिला मिठी मारते. नोराला पाहून चाहतीला अश्रू अनावर होतात आणि ती रडायला लागते. नोरा चाहतीला विचारते, तिलाही डान्स करायला आवडते का? यावर तान्याना मान हलवते. त्यानंतर चाहती नोराच्या पाया पडते आणि निघून जाते.
View this post on Instagram
दरम्यान, या व्हिडीओवर सध्या भरभरुन कमेंट येत आहेत. एका यूजरने लिहिले, 'किती क्यूट.' दुसर्याने लिहिले, 'नोरा खूप सुंदर आणि दयाळू व्यक्ती आहे. एका यूजरने लिहिले की, नोरा तू राणी आहेस.
अलीकडेच नोरा फतेही सिद्धार्थ मल्होत्रासोबत इंद्र कुमार लिखित आणि दिग्दर्शित 'थँक गॉड' या कॉमेडी चित्रपटाच्या रिमेक मणिके मागे हित या गाण्यात दिसली. सिद्धार्थ मल्होत्रासोबत माणिक या गाण्यात नोराची केमिस्ट्री चांगलीच आवडली होती. याशिवाय अभिनेत्री सध्या टीव्ही शो झलक दिखला जा 10 मध्ये जज आहे. त्यांच्याशिवाय माधुरी दीक्षित आणि करण जोहरही या शोमध्ये जजच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Dancer, Entertainment, Nora fatehi