मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /जान्हवी कपूरने 'ओम शांती ओम'चा 'तो' आयकॉनिक सीन केला रिक्रिएट, VIDEO व्हायरल

जान्हवी कपूरने 'ओम शांती ओम'चा 'तो' आयकॉनिक सीन केला रिक्रिएट, VIDEO व्हायरल

जान्हवी कपूर

जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने आई श्रीदेवीच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आपला अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर जान्हवीने बॉलिवूडमध्ये एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने आई श्रीदेवीच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आपला अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर जान्हवीने बॉलिवूडमध्ये एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. स्टारकिड असूनही जान्हवीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती कायमच निरनिराळ्या पोस्ट शेअर करत असते. अशातच जान्हवीची नवी पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की जान्हवीने 'ओम शांती ओम'चा आयकॉनिक सीन रिक्रिएट केला आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप सोडली. जान्हवी कपूर एका मोठ्या झुंबराखाली उभी राहिली आहे. तिचा मित्रही व्हिडीओमध्ये पहायला मिळतोय. जान्हवी म्हणते 'याच झुंबरखाली माझ्या शांतीची लाश सापडली'. पुढे तिचा मित्र हसताना दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करत जान्हवीने लिहिलं ' ही शांती वेगळीच दिसत आहे'.

जान्हवीच्या या पोस्टवर अनेक कमेंट येताना दिसत आहे. 'शांतीला पाण्यात उकळलं काय, ये शांती नाहीये शांतीला आहे,' अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर येत आहेत. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जान्हवी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलीये.

दरम्यान, जान्हवीने आत्तापर्यंत मोजकेच चित्रपट केले आहेत, पण तिची लोकप्रियता खूप जास्त आहे. जान्हवी आगामी चित्रपट जन गन मन मध्येही दिसणार आहे. ज्यामध्ये ती दक्षिण स्टार विजय देवरकोंडा आणि पूजा हेगडे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याव्यतिरिक्त जान्हवीकडे करण जोहरचा दोस्ताना 2 हा चित्रपटही आहे. जान्हवीचा नुकताच 'मिली' चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास जादू दाखवू शकला नाही.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Deepika padukone, Entertainment, Janhavi kapoor, Shah Rukh Khan